Ticker

6/recent/ticker-posts

वाहतूक नियम मोडणा-यांवर वाढवणा पोलिसांची धडक !!

हाळी-हंडरगुळीकरांतून होतेय स्वागत...
हंडरगुळी | 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर :-३/३ व ४/४ जण बसून फटाका हाॅर्न व सायलंन्सर वाजवित सुसाट धावणा-या बाईक्स,नंबर नसलेले, फोनवर बोलणारे, अल्पवयीन चालक,लायसंन्स व आर.सी.बूक इ.कागदपञ नसलेले व नांदेड-बिदर महामार्गाला व छञपती शिवाजी चौक येथे वाहनतळ बनवुन बेशिस्तीत पार्क केलेले लहान-मोठ्या वाहनांमुळे पदचारी, व्यापारी, वयस्कर मंडळी व नवजात बालक आदी मंडळी वैतागली आहे.आणि या अशा मुजोर व बेशिस्त वाहनधारकांमुळे अपघात होण्यासह शांतता भंग होण्याची भीती जनतेतून व्यक्त होत होती. म्हणुन या विरुध्द आम्ही नुकतीच सचिञ बातमी देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.म्हणुन उदगीर तालुक्यातील हाळी व हंडरगुळी या २ गावात वाहतूक नियम मोडणा-या व बेशिस्तीत गाडी पार्क केलेल्या वाहनधारकांवर वाढवणा बू. पोलिसांनी दि.२० जून रोजी धडक द्यायला म्हणजे कारवाही करायला सुरुवात केली आहे.व या धडाकेबाज , धरपकड कारवाहीत अनेक वाहनांवर वाहतूक नियमानुसार कारवाही केली.तसेच ही मोहिम चालूच राहणार आहे.तेंव्हा सर्व वाहनधारकांनी वाहतूक नियम व शिस्त पाळावे, असे आवाहन जाॅंबाज सपोनि. एस.पी.गायकवाड यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना केले आहे. जाॅंबाज सपोनि.एस.पी. गायकवाड, पो.हे.काॅ. एस.पी.दळवे-पाटील, शिवप्रताप के. रंगवाळ,चालक तथा एएसआय.जी. एस.मोरे,पो.काॅ.डी. सोनकांबळे व महिला पोलिस आर.डी.सपकाळ या सर्वांनी ही धरपकड मोहिम राबविली आहे.व याचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.तसेच ही मोहिम ८ दिवसा मधून किमान २ वेळेस तरी राबवावी, अशी अपेक्षा जनतेची आहे.
मेन मार्केट मध्ये,ग्रा.पं.समोर तसेच महामार्गावर असलेल्या दुकाणापुढे अनेक वाहनधारकांनी वाहनतळच बनवलेत. व तेथेच दिवसभर बेशिस्तीत गाड्या पार्क करतात.त्या गाड्यांवर ही कारवाही करावी.दि.२० जुन रोजी मोहिम राबविलेले पोलिस अधिकारी व

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या