Ticker

6/recent/ticker-posts

वन टू वन चे आवाहन आदिवासी संघटनांनी जिंकले;भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी हारले!

पत्रकार परिषदला आदिवासी संघटना आले;आमदार चंद्रकांत रघुवंशी पळाले!


चित्रा न्युज प्रतिनिधी 
शहादा : शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदूरबार जिल्ह्य़ातील आदिवासींच्या जमिनी तसेच महारवतन,ईनामी, सरकारी,गायचरण,राममंदिराची जमिनी बेकायदेशीर, अवैद्य रित्या, बोगस पद्धतीने,व्हायटर लावून हडप केल्या आहेत,त्या जमिनींची सखोल चौकशी करून चंद्रकांत रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा,अशी मागणी आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांचेकडे केली.त्यानंतर १६ मे २०२५ रोजी शहादा येथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालय उद्घाटन कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटना ह्या तीनपाट आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.त्याच सभेत आदिवासी संघटनांनी वन टू वन आ जाना, मैं बैठने को तैयार हू,मी पत्रकार परिषदेत जमिनीचे पुरावे दाखवायला तयार आहे,असे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांना आवाहन केले होते. ते आवाहन स्वीकारून दिनांक १३ जून २०२५ रोजी आदिवासी संघटनांनी शासकीय विश्रामगृह शहादा येथे पत्रकार परिषदेत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी यावे,असे जाहीर आवाहन केले होते.आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जमिनीच्या नोंदवहीत व्हायटर लावून नंदूरबार जिल्ह्य़ातील दुधाळे येथील जमीन बेकायदेशीर हडप केल्याचा एक पुरावा सोशल मिडीयावर प्रचंड वायरल झाला.त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी यांनी बेकायदेशीर हडप केलेल्या जमिनींची पोल आधीच खुलली.त्यामुळे शहादा येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत रघुवंशी आलेच नाही. 
                   आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी लबाडी करून आदिवासींच्या व इतर जमिनी हडप केल्या आहेत. त्यामुळे ते पत्रकारांपासून लपत आहेत, त्यांनी जमिनींची चोरी केली आहे.आदिवासी लोकांना लुबाडले आहे.जनतेला फसवले आहे.त्यांनी बोगस पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हडप केल्या आहेत, हे आज सिद्ध झाले.त्यांच्यात दम राहिला असता तर आज आदिवासी संघटनांसमोर व पत्रकारांसमोर आले असते.चंद्रकांत रघूवंशी हे आदिवासी संघटनांना घाबरले म्हणून आजच्या पत्रकार परिषदेत आले नाही.तरी जोपर्यंत आमच्या आदिवासींच्या जमिनी चंद्रकांत रघुवंशीकडून परत मिळत नाहीत, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील. भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ, आदिवासींचा जमीन लुटेरा चंद्रकांत रघुवंशी चले जाओ, पत्रकार परिषदेपासून पळ काढणारा चंद्रकांत रघुवंशी मूर्दाबाद, अशा जोरदार घोषणा आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
             यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे,कार्याध्यक्ष रवींद्र वळवी,कार्यकर्ता सुनिल पवार, भारतीय स्वाभीमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी,नंदूरबार तालुकाध्यक्ष अजय वळवी,सामाजिक कार्यकर्ता योगेश गावीत, बिरसा फायटर्स तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,मालदाचे अशोक पावरा,प्रभूदत्तनगरचे अरूण पावरा,भारत आदिवासी संविधान सेनेचे अशोक ठाकरे,गणेश पवार, वसंत चौधरी आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या