Ticker

6/recent/ticker-posts

महानगरपालिकेत शहर वाहतुक नियोजनाची आढावा बैठक संपन्न

शहर वाहतुक शाखेचे अधिकारी होते उपस्थित*

विजय चौडेकर नांदेड जिल्हा प्रतिनिधी चित्रा न्यूज 

नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीत शहरातील वाहतुक व्यवस्थेतील सुधारणे संदर्भातील आढावा आज दिनांक ११.०६.२०२५ रोजी *मनपा उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु* यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीस शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री गुट्टे व श्री पवार यांची प्रमुख उपस्थित होती.

वाहतुक नियोजन आढावा बैठकीत प्रामुख्याने मनपा हद्दीतील विविध रस्त्यांवर आवश्यकतेनुसार दिशा दर्शक फलक, गतीरोधक पट्टी, झेब्रा क्रॉसिंग इत्यादी उपाययोजना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच शहरात बहुतांश ठिकाणी महानगरपालिकेने नो-पार्किंग फलक लावण्यात आलेले असुन टोइंग-व्हॅन द्वारे नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर सुद्धा कारवाई महापालिकेमार्फत होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्याचप्रमाणे शहरातील ज्या रस्त्यावर दुभाजक नाहीत तो रस्ता सम-विषम पार्कंग करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असुन या उपक्रमात महापालिकेस शहर वाहतुक शाखेचे सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे आठवडी बाजार पर्यायी जागेत बसवुन वाहतुकीची समस्या सोडविणे आवश्यक असुन या उपक्रमासाठी सुद्धा पोलीस प्रशासनाची मदत लागणार असल्याचे यावेळी उपआयुक्तांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.

शहरात सध्या एकुण १७ वाहतुक सिग्नल कार्यान्वित असुन नव्याने एकुण १२ सिग्नल उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जिल्हा नियोजन समितीस सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला असुन सदर प्रस्तावास मंजुरी अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीच्या समारोपास शहर वाहतुक शाखेने शहरातील नो-पार्कंग स्पॉट शोधुन महानगरपालिकेस दिल्यास त्याप्रमाणे त्याठिकाणी सुध्दा नो-पार्कीग फलक लावण्याचे आश्वासन यावेळी उपआयुक्तांनी दिले आहे. तसेच महानगरपालिच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभागाने शहर वाहतुक शाखेशी वेळोवेळी समन्वय साधुन शहरातील वाहतुक सोडविण्यासाठी प्रामुख्याने साप्ताहीक बाजार स्थलांतर, पार्कंग स्थळ निश्चिती, पंक्चर स्पॉट शोधणे, शहरातील निश्चित केलेला हॉकर्स झोन, पार्कंग व नो-पार्कीग झोन या बाबीची काटेकोरपणे अंमबजावणी करण्याठी उपआयुक्तांनी आदेशीत केले आहे.

सदरील बैठकीस महानगरपालिकेचे उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु यांच्यासह शहर पोलीस वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक गुट्टे व पवार, महापालिकेचे क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, राजेश जाधव, गौतम कवडे, निलावती डावरे, कनिष्ठ अभियंता संदिप पाटील, व्ही. जी. गोकुळे व राजकुमार बोडके यांची उपस्थिती होती,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या