भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : पोलिसांना मिळालेल्या एका गोपनीय माहितीच्या आधारे शहरातील भंगाराम वार्ड येथील एका घरातून लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. सदर कारवाई दिनांक 18 रोज बुधवार ला भद्रावती पोलिसांकडून करण्यात आली.
याप्रकरणी आरोपी शाहरुख बब्बु शेख, वय 32 वर्ष, राहणार भंगाराम वार्ड याचेवर भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला सूचना पत्रावर सोडण्यात आले आहे. सदर कारवाई ठाणेदार लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनात गजानन तुपकर, अनुप आष्टुनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, खुशाल कावळे,योगेश घाटोळे यांनी केली.घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
0 टिप्पण्या