चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे स्वागत श्री शंकर सहकारी साखर कारखाना व ग्रामपंचायत सदाशिवनगर यांच्या वतीने करण्यात आले. तसेच माळशिरस तालुक्यातील माऊलीच्या पालखीचे पहिले गोल रिंगण पुरंदावडे या ठिकाणी पार पडले. माऊलीच्या पादुकाचे व अश्वाचे पूजन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती मा.श्री.अर्जुनसिंह मोहिते पाटील* यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
श्री शंकर सहकारी कारखान्याच्या वतीने 10 हजार भाविकांना अन्न दान करण्यात आले . या वेळी अभिजित डुबल साहेब, रविराज जगताप, सदाशिवनगर सरपंच विरकुमार दोशी, उपसरपंच विष्णु भोंगळे सर मा उपसरपंच उदय धाईजे श्री शंकर कारखान्याचे संचालक रामदास कर्णे, रामभाऊ खुळे, सुनिल माने, दादा पाटील, बिनू पाटील, महादेव शिंदे, सुधाकर पोळ , कारखान्याचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी स्टाफ उपस्थित होता
रिंगन सोहळ्याची तयारी पूरंदावडे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच राणी मोहिते, उपसरपंच देविदास ढोपे, प्राजक्ता ढोपे, भगवान पिसे, पोपट गरगडे, मोहनांनद महाराज, संतोष शिंदे, महादेव बोराटे, विठ्ठल अर्जुन, सुदाम ढगे, पांडुरंग सालगुडे पाटील,दादा मोहिते, धनाजी नाळे, हरी राऊत, नारायण सालगुडे पाटील,विजयसिंह पालवे, नाना ओवाळ, ज्ञानदेव पालवे, नामदेव बोडरे, ज्ञानदेव चव्हाण, शेखर सांवत, बाबा बोडरे, दत्तात्रय पिसे , ग्रामसेवक सचीन बनकर व ग्रामस्थ तसेच शेकडो युवा कार्यकर्त्यांनी सहकार्य केले
*या सोहळ्या मध्ये सर्व विश्वस्त, चोफदार व प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान मा अर्जुनसिंह मोहिते - पाटील यांचे हस्ते करण्यात आला*
0 टिप्पण्या