Ticker

6/recent/ticker-posts

भद्रावती नगरपरिषदेला लागले ग्रहण भाडेतत्वावर दिलेल्या जमिन मालकानेच केली जप्तीची कारवाई

खबळजन : भद्रावती नगरपरिषदेर जमिन मालकाने केली जप्तीची कारवाई 

चित्रा न्युज प्रतिनिधी 

भद्रावती : आजपर्यंत आपण नगरपरिषदने घर मालकावर घर  टॉक्स पाणी कर मालमत्ता कर व ईतर कर न भरल्यामुळे घर मालकाच्या घरावर जप्तीची कारवाई केल्याच्या बातमी ऐकली असेल  पण या उलट भद्रावती येथील अनेक पुस्कार प्राप्त केलेल्या नगररिषदेवर घरमालकानेच जप्तीची कारवाई केल्याने भद्रावती परीसरात कुतुहलाचे वातावरण पसरले आहे.

प्राप्त माहिती नुसार आठवडी बाजारासाठी भाडेतत्वावर दिलेल्या खासगी जमिनीचा जवळपास ६६ लक्ष रुपये किराया जमिनमालकाला वेळोवेळी मागणी करुनही व योग्य संधी देऊनही दिला नसल्याने  जमिन मालकाने याविषयी वरोरा न्यायालयात दाद मागीतली व केस जिंकली. त्यानुसार न्यायालयाने दिलेल्या जप्तीच्या अधिकारानुसार जमिनमालकाने जप्तीची कारवाई करीत भाडे वसुलीसाठी नगर परिषद कार्यालयातील अनेक साहित्य जप्त केले.
जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करुन थकलेले भाडे वसुल करण्यात येईल असे जमिन मालकाकडुन सांगण्यात आले.आठवडी बाजारासाठी शहरातील राजु गुंडावार, संजय गुंडावार व किशोर गुंडावार यांची ३० हजार ०३३ फुट जमीन २०१८ मध्ये भद्रावती नगरपरिषदने ६६ हजार रुपये प्रतीमहिणा भाडेतत्वावर घेतली होती.प्रारंभी काही महिने भाडे चुकते करण्यात आल्यानंतर नगरपरिषदेकडून पुढील भाडे थकीत करण्यात आले.थकीत भाड्याची जवळपास ६६ लक्ष ऐवढी रक्कम थकीत झाली.या रकमेची गुंडावार यांनी नगरपरिषद कार्यालयाकडे अनेकदा मागणी केली व त्यासाठी पुरेशी संधिही दिली.मात्र नगरपरिषदेतर्फे सदर रक्कम चुकती करण्यात न आल्याने गुंडावार यांनी याविरोधात वरोरा येथील दिवानी न्यायालयात खटला दाखल केला.या खटल्याचा निकाल न्यायालयाने गुंडावार यांच्या बाजुने देत.रक्कम वसुलीसाठी जप्तीचे अधिकार गुंडावर यांना दिले.न्यायालयाच्या आदेशानुसार गुंडावार यांनी दिनांक ३० जुनला नगर परीषद कार्यालयात जाऊन जप्तीची कारवाई सुरु केली.या जप्ती अंतर्गत कार्यालयातील सोफा,खुर्च्या यासह विविध साहित्य जप्त करण्यात आले. नगरपरिषद प्रशासनाच्या चुकिच्या धोरणामुळे नगरपरिदवर जप्तीच्या कारवाईमुळे भद्रावती नगरपरिषदेला उलटे ग्रहण लागल्यामुळे नगरपरिषदेची लक्तरे वेशीला टांगली गेल्याची परिसरात जोरदार चर्चचेचा विषय ठरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या