चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा:-जिल्हयात महावितरण कडून मीटर लावण्याची मोहीम सुरू आहे. स्मार्ट मीटर लावल्यानंतर वेगाने मीटर फिरणे व चुकीची रीडिंग मिळणे,वीज देयके जास्त येणे ई बाबत विद्युत ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या,सामान्य व ग्रामीण नागरिकांना मीटर अहवाल,मोजमाप समजत नाही,माहवितरण चे कंत्राटी अधिकारी,कर्मचारी नीट समजावून सांगत नाहीत,शंकांचे निरसन बरोबर करीत नाही उलट ग्राहकांना जोर जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यास सांगतात,अनेकदा तंत्रिक अडचणी व बिघाड ही होत असल्याची तक्रारी ,वीज खंडित,मीटर बंद ई मुळे आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे करिता ग्राहकांचे शंकेचे निरसन करण्यासाठी महावितरण कडे अखिल भारतीय ग्राहक पंचायत ने चर्चा सत्राचे आयोजन करण्यासाठी मागणी केली होती.
या समस्याचे चे निरसन करण्यासाठी नुकतेच महावितरण कंपनी भंडारा ने आपल्या कार्यालयात चर्चा सत्राचे आयोजन केले होते.अनेक प्रश्नांचे माध्यमातून चर्चा घडवून प्रश्नांचे उत्तरे देवून शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांचे महावितरण चे वरिष्ठ अधिकारी व प्रायव्हेट संस्था मोंटोकार्लो च्या अधिकाऱ्यांनी या कार्यशाळेत आलेल्या ग्राहकांच्या प्रश्नांचे निरसन करण्याचे प्रयत्न केले .
या प्रसंगी अ. भा ग्रा. पं.चे नितीन काकडे, महावितरण चे कार्यकारी अभियंता गजानन जायसवाल, कार्यकारी अभियंता( प्रशासन) प्रीती फुले मॅडम,अती. कार्यकारी अभियंता, राम पराडकर,अखिल ग्रा.पं चे प्रांत आर टी सेल प्रमुख चंद्रशेखर साठे,विदर्भ प्रांत पर्यावरण प्रमुख संजय आयलवार,जिल्हा अध्यक्ष जयंत सब्जीवाले, जिल्हा सचिव अनिल शेंडे,विष्णुपंत पंडे,सईद शेख,रमेश पांडे, पी.पी.लांजेवार,पुरुषोत्तम वैद्य, पद्माकर डुंभरे(सील्ली ),विजय क्षीरसागर,महावितरण तथा संस्था चे पदाधिकारी , कर्मचारी व नागरिक ई उपस्थित होते। नितीन काकडे,गजानन जयस्वाल , ई नी मार्गदर्शन केले.संजय आयलवर ,सईद शेख, पी.पी. लांजेवार,पद्माकर डुंभरे,अनिल शेंडे,पुरुषोत्तम वैद्य ई नी विचारलेल्या प्रश्नांची स्मार्ट मीटर कंपनी चे मॅनेजर नी उत्तरे देवून निरसन केले.
0 टिप्पण्या