Ticker

6/recent/ticker-posts

हंडरगुळी येथील जि.प.केंद्रिय.प्रा. शाळा व्हेंटिलेटरवर ..


चित्रा न्युज प्रतिनिधी 
 हंडरगुळी :-जसे राज्यात खाजगी अनुदानित मराठी व इंग्रजी शाळा उंदड झाल्या आहेत.तशा हंडरगुळी (ता.उदगीर)  येथे पण उंदड झालेल्या व विद्यार्थी, विद्यार्थीनींनी बहरलेल्या दिसतात. तर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक मुलांसह मुलींची असलेल्या दोन्ही शाळा पटसंख्येअभावी बंद पडणार असे चिञ हंडरगुळीत दिसत आहे.
समाजातील शेवटच्या घटकातील मुलांनी शिकलेच पाहिजे.तसेच त्या सर्व मुलामुलींना मोफत व हक्काचे तसेच उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे हे कायद्याने बंधनकारक आहे.तसेच शासनाच्या शिक्षण खात्यातर्फे सक्तीचा शिक्षण हक्क या कायद्याची अंमलबजावणी करणे सक्तीचे आहे.माञ,हंडरगुळी तालुका उदगीर येथे असलेल्या जि.प.केंद्रीय प्राथमिक मुलांसह मुलींच्या शाळेची व परिसराची सध्याची अवस्था बघून जि. प.व पं.स.च्या शिक्षण अधिकारी महाशयांना सक्तीचा,दर्जेदार शिक्षण हक्क या कायद्याचा विसर पडला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
हंडरगुळीत मराठी व इंग्रजी माध्यम असलेल्या ६ खाजगी शाळा आहेत. तसेच मुलांची १ व मुलींची १ अशा २ शाळा सरकारी आहेत.आणि जि. प.शाळेत बोटावर मोजण्याइतकी तर खाजगी शाळांमध्ये शकडोंच्या संख्ये मध्ये पटसंख्या दिसते.शिक्षण अधिका-यासह 
आज उद्योग,राजकिय तसेच नोकरी च्या क्षेञात उच्च व अतिउच्च पदावर असलेले हंडरगुळीतील कांही व्यक्ती ज्या जि.प.शाळेत शिकलेत.त्याच जि. प.शाळेची आजची झालेली दयनीय अवस्था त्यांना ही का दिसत नाही?असा प्रश्न उपस्थित होतो.

राज्यात मराठी व इंग्रजी माध्यमच्या खाजगी शाळा उदंड झालेल्या असताना सरकारी मनपा.नपा.जि.प. शाळांना घरघर लागल्याचे चिञ सर्व लहान,मोठ्या गाव,शहरात दिसते. पण शासन,प्रशासनाला दिसत नाही. याचेच आश्चर्य वाटते.तसेच सरकारी शाळा व्हेंटिलेरवर असतानाही जि.प. व पं.स.शिक्षण विभाग झोपेचे सोंग घेतेय की काय?तसेच हंडरगुळीतील जि.प.कें.शाळा व्हेंटिलेटरवर असली तरीही याच शाळेत शिकूनसवरुन राजकीय, उद्योग व नोकरी या क्षेञात उच्च व अतिउच्च पदावर गेलेल्यांना तसेच डि.जे.समोर धांगडधिंगाणा करणा-या युवकांना याचे कसलेही सोयरसुतक का नाही असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
 *ही शाळा व्हेंटिलेटरवर जाण्याचे कांही प्रमुख मुद्दे ..*
शासन,प्रशासनाद्वारे सक्तीचा शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी न करणे.
शाळेच्या मेन गेट समोरच होणारी  अवैध माॅंस विक्री.तसेच शेजारीच असलेले अवैध गो माॅंस विक्रीचे (बिर्याणी) हाॅटेल्स.
शाळेच्या मागे,पुढे झालेले अतिक्रमन
हे म्हत्वाचे मुद्दे आहेत हंडरगुळीतील जि.प.कें.प्रा.शाळा व्हेंटिलेटरवर जायला व बंद पडायला.
*पुढच्याच वर्षी बंद पडणार हंडरगुळीची जि.प.शाळा* 
१६ जुन पासून नवे शैक्षणिक सञ सुरु झाले.आणि गावातील सरकारी कमी अन् खाजगी शाळा पटसंख्येनी बहरल्या.याला कारणीभुत असलेले घटकांपैकी सर्वात म्हत्वाचे कारण म्हणजे शाळेच्या अवती-भोवती होत असलेली उघड्यावरची माॅंस,बिर्यानी विक्री.ते पण विनापरवाना,अवैध ! व हा सगळा गोरख धंदा माहित असून सुध्दा प्रशासनाचे जाणुनबुजून होत असलेले दुर्लक्ष.
कारण,पालक शिक्षित असो अथवा अडाणी.कोणीही अशा दुर्घंधीयुक्त परिसर असलेल्या शाळेत पाल्यांना शाळेत आम्ही कितीही प्रयत्न केला तरीही घालतच नाहीत.
तसेच शाळेच्या अवती-भोवती माॅंस व बिर्याणी विक्रीचे सेंटर असलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणुन हंडरगुळीच्या शाळेची ओळख आहे. आणि अशी ही शाळा मुख्यमंञी माझी शाळा,सुंदर शाळा.कशी असू शकेल?तसेच याबाबत संबंधित वरीष्ठ अधिका-यांनी तात्काळ येथे येऊन पाहणी करुन योग्य ती कडक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा ही शाळेला पुढच्याच वर्षी  कायमस्वरुपी टाळे लागतील!असे मत एका शिक्षकाने नाव,गाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर आमच्या जवळ बोलताना व्यक्त केले आहे.

या शाळेच्या अवती-भोवती होणारी माॅंस विक्री ही अवैध व अतिक्रमीत जागेवर होत आहे.असा ठराव ग्रा.पं. ने घेतला आहे.तसेच ही जागा सा. बांधकाम विभागाची असल्यामुळे त्यांनीच कारवाई करणे अपेक्षित आहे.असे मत सरपंच विजयकुमार अंबेकर यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या