Ticker

6/recent/ticker-posts

विविध मागण्यासाठी शासकीय व निमशासकीय जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची यशस्वी निदर्शने


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा:-राज्यसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षतेकर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी बुधवार दि 9 जुलै रोजी जिल्हाधिकारी आवारात कर्मचाऱ्यांकडून दुपारी 1.30 ते 2.00 या वेळेत जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी विविध मागण्याबाबत घोषणा देण्यात आल्या. 
 बुधवार 9 जुलै रोजी जिल्हा  अधिकारी कार्यालयासमोर जेवणाच्या सुटीच्या कालावधीत सर्व कर्मचारी यांनी एकत्रित येऊन निदर्शने केली. यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक श्री रामभाऊ येवले, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्य सल्लागार श्री अतुल वर्मा, मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री दिलीप रोडके , श्री सुनील मदारकर, विशाल तायडे ,श्रीधर काकीरवार, रवि नखाते ,योगेश पुडके ,संजय आजबले, प्रेमलाल लांजेवार गंगाधर भदाडे, माधवराव फसाटे सुधीर शेंडे, संजय पडोळे, शिवदास लांजेवार, व्हि. जी. बोरकर, संजय मोहतुरे सुधांशू नेवारे संजय नागदेवे, सुधीर शेंडे व इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. 
 शेवटी माननीय निवासी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देऊन सभेचे समारोप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या