Ticker

6/recent/ticker-posts

एस.टी.बसच नाही,तर पास का काढलात?हाळी-हंडरगुळीतील पालकांचा सवाल.


चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी |राज्यशासनाच्या नवीन धोरणानुसार शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना शाळेत पास देण्याची सुविधा सध्या सर्वञ राबवण्यात येते.आणि याच धोरणा प्रमाणे उदगीर बस अगारातील कांही व्यक्ती हंडरगुळी ता.उदगीर येथील कांही शाळामध्ये विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी आले होते.त्यावेळी कांही विद्यार्थ्यांना पास देण्यात ही आले. परंतू,वडगाव,बोरगाव ता.चाकुर या गावासाठी एकही बस नाही.तर मग विद्यार्थ्यांना पास देण्यामागचा मुख्य हेतू काय?टार्गेट पुर्ण करण्यासाठीच तर बसेस नसल्यामार्गावरील शालेय विद्यार्थ्यांना पास देत नाहीत ना?असे प्रश्न हाळी-हंडरगुळी परिसरातील सुज्ञ पालकांमधून विचारला जातोय. म्हणुन युवासेना जिल्हा सहसचीव रमनभैया माने,गिरीधर शाहीर, दत्ता माने,कचरु माने,प्रभाकर काळे,जेष्ठ पञकार विठ्ठल पाटील या पालकांनी दि.८जुलै रोजी हंडरगुळी येथील दोन शाळांना भेट घेऊन बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना ये- जा करण्यासाठी कोणती व्यवस्था आहे. याबद्दल माहिती घेतली असता शिवाजी उच्च व उच्च माध्यामिक विद्यालयातील मु.अ.व एका सहशिक्षकाने वरील माहिती दिली.
सर्व प्रकारच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा भरवसा असलेली एस.टी. बस आहे.आणि यंदापासून विद्यार्थी वर्गांना त्या-त्या शाळा,काॅलेज मध्ये स्टूडंट पास देण्याची/मिळण्याची सोय शासनाने केली आहे.म्हणुन एसटी प्रशासन आपल्या दारी (शाळा,काॅलेज मध्ये) या योजनेतून विद्यार्थ्यांना पास देत आहे.या गावी असलेल्या शाळा,ज्यू,काॅलेज मध्ये वडगाव,शेळगाव,हटकरवाडी,बोरगाव,चिद्रेवाडी,राचन्नावाडी,नागदरवाडी ता.चाकुर येथील शेकडो विद्यार्थी शिकण्यासाठी ये-जा करतात. या विद्यार्थ्यांना एसटी बस नसल्याने मिळेल त्या वाहनातून ये-जा करावे लागते.तर कांही पालक स्वत: मुला, मुलींना आणत व नेत असतात.व या विद्यार्थ्यांची गरज व शिकण्याबद्दल असलेली तळमळ बघून शिवाजी शाळेतर्फे उदगीर आगाराकडे शाळे च्या वेळेत बस सोडण्याची मागणी करुनही ती सुरु केली नाही.
प्राचार्य.आर.आर.सय्यद
शिवाजी ज्यू.काॅलेज,हंडरगुळी.


केवळ बस अभावी कुणीही शिक्षणा पासून अलिप्त राहू नये.तसेच अन्य वाहनातून धोकादायक प्रवास करावा लागु नये,यासाठी उदगीरच्या
एसटी.प्रशासनाने शाळेच्या वेळेत वडगाव व बोरगाव रोडवर बस सुरु करावी.तसेच बस चालू नसताना पास काढण्यामागचा हेतू काय? रमन माने,हाळी

शासनाने मुलींनी शिकावे यासाठी मोफत पास ही सुविधा सुरु केलीय. तरीही वरील गावात बस नसल्याने या परिसरातील शेकडो मुली मिळेल त्या वाहनातून शाळा, काॅलेजसाठी ये-जा करतात.तेंव्हा महामंडळाने त्वरीत बस सुरु करावे,अन्यथा मंञी महोदयाकडे तक्रार करावी लागेल.
दत्ता माने,हाळी.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेतून विद्यार्थीनींना मोफत पास देण्यात येत आहे.तसेच कांहीना पास दिले असून,कांही बसेस पंढरी च्या वारीसाठी गेल्यात.व पंढरपुर वारीहून परत आल्यानंतर वरील मार्गावर बस सुरु केली जाईल.
चिन्मय चिटणीस,बस अगार प्रमूख, उदगीर
 
तालुक्यात असलेल्या शैक्षणिक संस्थेत शिकणा-या बाहेरगावच्या मुला-मुलींची यादी शाळेकडून घेऊन  नियमीतपणे शाळेत ये-जा करत असलेल्यांची उपस्थिती ,शाळेची टी. सी.ओळखपञ आदी कागद बघून ५वी,ते१२वीतील पाञ मुलींची यादी तयार करुन पास देत आहोत.तसेच हंडरगुळीच्या शाळेत ज्या,ज्या गावा तून मुले येतात त्या गावासाठी बसची सोय करण्यात येईल.
अशोक पवार,बसस्थानक प्रमूख, उदगीर

जर एखादी विद्यार्थीनी सतत शाळा , काॅलेज मध्ये गैरहज राहत असेल तर त्या मुलीचा पास रद्द केला जातो.त्या मुळे मुलींनी न चूकता नियमितपणे शाळेत उपस्थित असणे गरजेचे आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या