चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा : नंदुरबार जिल्ह्य़ातील बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदूरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी ,गोविंद पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
नंदूरबार जिल्ह्य़ात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणा-या शेतक-यांची संख्या विक्रेत्यांकडे वाढली आहे.या गर्दीचा गैरफायदा घेऊन काही बियाणे व खत दुकानदार बोगस बियाणे व खतांची विक्री करत आहेत. बोगस बियाणांमुळे पिकांची वाढ होत नाही व उत्पन्नात घट होते.शेतक-यांना आर्थिक नुकसान होते.त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. म्हणून नंदूरबार जिल्ह्य़ात सर्व बियाणे व खतांची तपासणी करूनच विक्रीस परवानगी देण्यात यावी.बोगस बियाणे व खत विक्रेत्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नंदूरबार यांच्याकडे करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या