चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर : आज विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ठाम आणि प्रभावी मागणी केली. शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राज्यात ‘कृषी न्यायालय’ आणि ‘एग्रीकल्चर ऑफेन्स विंग’ स्थापन करण्याची गरज अधोरेखित करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.
"इकॉनॉमिक ऑफेन्स विंग” श्रीमंतांसाठी, “रेरा” गृहखरेदीदारांसाठी, “ग्राहक व कौटुंबिक न्यायालयं” सामान्य नागरिकांसाठी आहेत,मग शेतकऱ्यांसाठीही स्वतंत्र न्याययंत्रणा का नसावी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.या मुद्द्यावर सभागृहात मोठा प्रतिसाद मिळाला असून, सरकारकडूनही सकारात्मक आश्वासन देण्यात आले.आ. सुधीर मुनगंटीवार यांचा हा शेतकऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी लढणारा बुलंद आवाज पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.
0 टिप्पण्या