Ticker

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षा पात्र आणि गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लातूर  :-सौ रुक्मिणी माता  माध्यमिक कन्या विद्यालय, हंडरगुळी येथे 15 ऑगस्ट निमित्त शाळेतील शिष्यवृत्ती परीक्षा पात्र विद्यार्थिनींचा आणि गुणवंत विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.  काही महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये चार विद्यार्थिनी पात्र झालेल्या असून त्यापैकी दोन मुली ह्या शिष्यवृत्तीधारक साठी निवड झालेली आहेत त्यामध्ये 1) वाघमारे नंदिनी दीपक 2) पांचाळ श्रेया अनिरुद्ध या दोन्ही मुलींचा व त्यांच्या पालकांचा प्रमाणपत्र व गुणपत्रक देऊन सत्कार करण्यात आला तसेच वर्ग पाचवी ते दहावी मधील प्रथम द्वितीय येणाऱ्या विद्यार्थिनींना नंदाने सर यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच वर्ग आठवीतील विद्यार्थिनींना घेण्यात आलेल्या मराठी पाठ सराव परीक्षा यामध्ये प्रथम द्वितीय आलेल्या विद्यार्थिनींना  त्यांच्या ज्ञानामध्ये भर व्हावा म्हणून विविध पुस्तकांचे बक्षीस्वरूपी भेट देण्यात आली, त्याचबरोबर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले संस्थेचे सचिव आदरणीय  श्री नारायण विठ्ठल वाघमारे , सर्व पदाधिकारी, आदरणीय मुख्याध्यापिका काळे मॅडम, सर्व शिक्षकवृंद , शिक्षकेतर कर्मचारी , सेवानिवृत्त शिक्षक मोरतळे पाटील सर आणि पालक हे आवर्जून उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी विशेष लक्ष संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री शशिकांत वाघमारे यांनी देऊन हा कार्यक्रम उचित प्रकारे पार पाडला. त्याचबरोबर पालकांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व पालकांनी झालेल्या सत्कार बद्दल आणि शाळेत होत असलेल्या परिसरातील सुशोभीकरणाबद्दल कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिलमपांडे सर , अनुमोदन नंदाने सर, आभार मसूरे सर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या