Ticker

6/recent/ticker-posts

रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर आपात्र केलेल्या लाडक्या बहिणींचा राज्य सरकारला तळताळट लागणार- सौ सरस्वती घोडके

चित्रा न्युज प्रतिनिधि 
सोलापूर :-2024 च्या निवडणुकीच्या तोंडावरती ,शिंदे  फडणवीस - पवार , महायुती सरकारने लाडकी बहीण ही योजना मोठ्या डामाडौलात सुरू केली यामध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यावरती दीड हजार रुपये टाकण्यातही आले.ही योजना सुरू करताना काही नियम व अटी लागू केल्या असताना अनेक महिलांचे अर्ज बाद होतील अशी परिस्थिती होती.परंतु त्यावेळी पुन्हा एकदा .
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे ,आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित दादा ,फडणवीस यांनी घोषित केले की सर्वच महिला या योजनेसाठी पात्र असतील.
मग त्याच्यामध्ये ज्यांच्या कुटुंबात चार चाकी वाहन असतील ,बागायत जमिनी असेल ,इन्कम टॅक्स भरत असतील.अशा कुटुंबातील ही सर्व महिलांना पात्र करण्यात आले .एवढेच काहीतर एकाच कुटुंबातील दोन पात्र महिलांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला.
याचाच अर्थ की या सत्तेसाठी हापपलेल्याला सरकारने 
राज्यातील महिला व त्यांच्या कुटुंबातील मत मिळवण्यासाठी लाडकी बहीण ही योजना सुरू केली व निवडणूक होऊन आता एक दीड वर्षातच ही योजना बंद करण्याच कारस्थान सुरू केले .
कोणतेही निकष लावून धडाधड महिलांचे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे बंद करण्यात आले आहेत राज्यातील एकूण लाभार्थी महिलांपैकी १ लाखापेक्षा  पेक्षा जास्त महिलांचे ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडकी बहिण योजनेचे प्रति महिना रु १५०० एप्रिल पासून ते ऑगस्टपर्यंत थकीत ठेवून पैसे सध्या बंद झालेले आहेत.
त्यामुळे या महिलांसह त्यांच्या कुटुंबातून प्रचंड रोष निर्माण होत असून ,आगामी निवडणुकांमध्ये या लबाड सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही .अशी प्रतिज्ञा या महिलांनी केलेली आहे. २०२४ विधानसभेची निवडणूक जिंकून सत्ता मिळवण्यासाठी केलेला हा जुमला होता .असे आता सध्या राज्यातील जनतेला कळून चुकलेला आहे . 
लाडकी बहीण योजने सह प्रत्येक सणाला मिळणारा आनंदाचा शिधा .तोही राज्य सरकारने सध्या बंद केलेला आहे. सध्या राज्य सरकारने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावश्यक वापरातील गहू ,ज्वारी ,डाळी ,खाद्यतेल गोष्टींवरती .भरमसाठ टॅक्स वाढवून सामान्य नागरिकांच जगणं मुश्किल केलेला आहे. पेट्रोल - डिझल ने शंभरी पार केलेली आहे. घरगुती गॅस ला हजार रुपये मोजावे लागत आहेत.
मोबाईल रिचार्ज प्रति महिना साडेतीनशे ते चारशे रुपये केलेले आहे. दैनंदिन गरजांचे खर्चाच्या प्रत्येक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे मध्यमवर्गीयां सह, शेतकरी, गोरगरीब यांच जगणं मुश्किल झालेला आहे .
वाढत्या महागाईमुळे कर्जबाजारी होऊन अनेक शेतकऱ्यांच बेरोजगार युवकांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे.
 पुढे बोलताना  मिरजगाव येथील सामाजिक महिला कार्यकर्त्या सौ सरस्वती भगवान बाबा घोडके यानी या सरकारच्या धोरणाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत.
येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिंदे -फडणवीस -पवाराना, 
ऐन रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडकी बहीण  योजनेतुन आपात्र करून नाराज केलेल्या , बहिणींचा तळतळाट  लागून हे सरकार सत्ते तून पायउतार होणार असे मत व्यक्त केले ,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या