Ticker

6/recent/ticker-posts

वर्ध्यात सामाजिक कार्यकर्त्यावर पोलिसांकडून धमक्या, मारहाण आणि खोट्या गुन्ह्यात डांबले – CCTV फुटेज असूनही सत्य दडपले

चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा :- वर्ध्यातील सामाजिक कार्यकर्ता विक्की  सवाई यांच्यावर दिनांक 18 फरवरी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील अंगरक्षक पोलिस कॉन्स्टेबल श्रितिज अशोकराव रोकडे, तसेच वर्धा शहर पोलिस ठाण्याचे थानेदार आणि स्टेशन डायरीमध्ये हजर असलेले सर्व पोलिस अधिकारी यांनी एकत्रितपणे गुन्हा केला आहे.
हे सर्व आरोपी मिळून खोटा गुन्हा तयार करून सवाई यांना बेकायदेशीरपणे लॉकअपमध्ये डांबले.

घटना:
सवई यांनी सांगितले की, “मी दिनांक 18 फरवरी 2025 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन बाहेर येत असताना आरोपी पोलिस कॉन्स्टेबल रोकडे यांनी मला अडवले आणि धमकी दिली – ‘जर तू जिल्हाधिकारींकडे पुन्हा निवेदन घेऊन आलास, तर तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल करून तुला जेलमध्ये टाकेन.’ मी याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न करताच रोकडे यांनी माझा मोबाईल हिसकावला, शिवीगाळ केली आणि मारहाण केली.”

खोटा गुन्हा आणि बेकायदेशीर कारवाई:
जसे ही घटना घडली  15 मिनिटांनी
सवाई यांनी लगेचच पोलिस अधीक्षकांना लेखी तक्रार दिली. तक्रार ची प्रत घेऊन  मी माझी आई रात्री चे 8 वाजता वर्धा शहर पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी पोलिस कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला असता, थानेदार आणि स्टेशन डायरीतील सर्व आरोपी पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला व मला म्हणाले की आमचे वरिष्ठ अधिकारी म्हणेल तर आम्ही तुझी तक्रार घेऊ  माझ्यावर उलट खोटा गुन्हा तयार करून  लॉकअपमध्ये डांबले.

CCTV फुटेज असूनही सत्य लपवले:
सवाई यांनी सांगितले की, “संपूर्ण घटना जिल्हाधिकारी कार्यालय आणि वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद आहे. जर मी दोषी असेन तर फुटेज का लपवले जात आहे? कारण फुटेज सार्वजनिक झाल्यास हे सर्व आरोपी पोलिस गुन्हेगार ठरतील.”

RTI आणि प्रमुख मागण्या:
सवई यांनी प्रथम अपीलाद्वारे पुढील मागण्या केल्या आहेत 

 चुकीची माहिती देणाऱ्या जन माहिती अधिकार्‍यावर माहिती अधिकार कायद्यानुसार दंडात्मक कारवाई.

 घटनेची संपूर्ण माहिती 15 दिवसांत लेखी स्वरूपात द्यावी.जिल्हाधिकारी कार्यालय आणि शहर पोलिस ठाण्याचे CCTV फुटेज स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत तपासावे. घटनेला आत्मसुरक्षेचा भाग म्हणून मान्यता द्यावी.आरोपी पोलिस कॉन्स्टेबल, थानेदार आणि स्टेशन डायरीतील सर्व आरोपी पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्ह नोंदवावा.निर्धारित कालावधीत आदेश न दिल्यास राज्य माहिती आयुक्तांकडे अपील करण्यात येईल.पोलिस अधीक्षकांना तीन वेळा लेखी तक्रार देऊनही, वरील आरोपी पोलिस कॉन्स्टेबल व शहर पोलिस ठाण्यातील दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या