लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
नांदेड :- करंजी येथील विजयमाला जयवंतराव कदम यांनी शिक्षक पदासाठी झालेल्या TAIT परीक्षेत तब्बल 146 गुण मिळवून गावाचं, कुटुंबाचं आणि गुरुजनांचं नाव उज्ज्वल केलं. हे यश म्हणजे केवळ एका विद्यार्थिनीचं नसून, तिच्या परिश्रमांचं, गुरुंच्या मार्गदर्शनाचं आणि परिवाराच्या आशीर्वादाचं आहे. त्यांच आतापर्यंत शिक्षण एम.ए.अर्थशास्त्र (सेट -अर्थशास्त्र ) एम.ए. मराठी, बी. एड. एम. एड. CTET पात्रता परिक्षा उत्तीर्ण असे आहे.
या यशानिमित्त मुख्याध्यापक श्री. गजानन सुर्यवंशी सर , कै. श्री. दे. वी. सरसम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थिनीच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू होते, तर गुरूंच्या डोळ्यांत अभिमानाची चमक होती.
या प्रसंगी करंजी गावचे पोलिस पाटील बापूराव मिराशे, कापसे गुरुजी, तसेच नवोदय क्लासेस, हिमायतनगर चे मार्गदर्शक प्रा. सज्जन कदम सर (ॲडव्होकेट) उपस्थित होते. या कार्यक्रमाने गुरु-शिष्य नात्याची पावित्र्यपूर्ण परंपरा अधिक दृढ झाली.
गुरूंच्या पावलावर चालणारा विद्यार्थी जेव्हा मोठं यश संपादन करतो आणि त्या विद्यार्थ्याचा सत्कार पुन्हा गुरूंच्या हस्ते होतो, ते क्षण दुर्मिळ असतात. या क्षणी संपूर्ण गावाला, सर्व मित्रपरिवाराला आणि उपस्थित मान्यवरांना प्रा. विजयमालाचा अभिमान वाटला. खरंच, हा सत्कार म्हणजे एक प्रेरणा, एक अभिमान आणि एक इतिहास बनून राहिला."
0 टिप्पण्या