Ticker

6/recent/ticker-posts

शिव पाणंद शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी राज्यातील कंपन्यांचा सीएसआर सक्तीचा करा – शरद पवळे(महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मुंबई :महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी राज्यातील कंपन्यांचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंड शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी सक्तीचा करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन यांना निवेदन सादर केले.

शेतरस्त्यांचा ज्वलंत प्रश्न :

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या शेतरस्त्यांअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

शेतीपूरक व्यवसाय बंद पडणे

शेतमाल बाजारात न पोहोचणे

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

जमिनी पडीक पडणे व शेतजमिनी कवडीमोल किंमतीत विकणे

शेतकऱ्यांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान

शेतरस्त्यांचा प्रश्न केवळ दळणवळणापुरता मर्यादित नसून तो थेट ग्रामविकास व शेतकऱ्यांच्या जीवनमानाशी निगडित आहे.


सरकारची पावले :

राज्यभरात शेतरस्त्यांचे सीमांकन, मोजणी आणि हद्द निश्चिती सुरू झाली आहे.
आता पुढील टप्पा म्हणजे या रस्त्यांचे तातडीने मजबुतीकरण करणे आवश्यक आहे.

शरद पवळे यांची मागणी :
“भारत कृषीप्रधान देश आहे. औद्योगिकीकरणासाठी अनेक शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली आणि त्यामुळे कंपन्यांचा विकास झाला, ही आनंदाची बाब आहे. परंतु कृषीची खरी प्रगती साधायची असेल तर शेतीला दर्जेदार शेतरस्ते मिळणे अत्यावश्यक आहे. अतिवृष्टीमुळे कच्चे रस्ते वाहून जातात आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते. जर कंपन्यांचा सीएसआर निधी सक्तीने शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी वळवला, तर ग्रामविकासाला मोठी चालना मिळेल आणि ‘समृद्ध शेतकरी – समृद्ध महाराष्ट्र’ हे स्वप्न साकार होईल.”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या