चित्रा न्युज प्रतिनिधी
वर्धा:- पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी . साळवे साहेब यांचे स्वागत समता नगरवासी यांच्या वतीने करण्यात आले. स्वागत आटोपल्यानंतर समता नगर मधील वाशी यांच्या समस्यांचे निवेदन सुद्धा त्यांना देण्यात आले त्यावेळी त्यांनी तात्काळ निवेदनावरती शेरा मारून संबंधितांना ते निवेदन पाठविले यावरून त्यांची कार्य तत्परता पाहायला मिळाली असे कर्तव्यदक्ष अधिकारी वर्धा पंचायत समितीला लाभल्यामुळे भविष्यामध्ये वर्धा पंचायत समितीच्या कामाला गती मिळेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली. यावेळी सम्यकदृष्टी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मनोज डोंगरे सचिव राजु थुल उपाध्यक्ष सुरेश वैद्य,सुभाष गायकवाड, बंडुजी नाखले, भाकेकर व समता नगर मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते*


0 टिप्पण्या