चित्रा न्युज प्रतिनिधी 
वर्धा :-मुंबई  सायन येथील गुरुनानक महाविद्यालयात दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी 'लोकशाही सप्ताह' (९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर) निमित्ताने "लोकशाही मूल्ये आणि घटनादर्शनी तत्त्वज्ञान" या विषयावर भव्य पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ह्या स्पर्धेचे आयोजन राज्यशास्त्र विभाग, 'इलेक्टोरल लिटरेसी क्लब' व संविधान क्लब' यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.  

या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विभागांमधून ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे तत्त्वज्ञान, घटनात्मक मूल्ये आणि समाजातील लोकशाहीचा प्रभाव विविध चित्ररचनांद्वारे प्रभावीपणे मांडला. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी तरुण पिढीच्या दृष्टिकोनाचे अनोखे दर्शन या स्पर्धेतून घडले.  

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि मार्गदर्शन  राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुमित खरात तसेच संविधान क्लबचे समन्वयक प्रा. अनिकेत उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यात संविधान क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष रोहन उघाडे, उपाध्यक्ष सायमा खान, सचिव शैफ खान, खजिनदार प्रिया शेट्टियार, तृतीय वर्षाची वर्गप्रतिनिधी नूरिन सोलकर, उपवर्गप्रतिनिधी रोहिणी देवेंद्र तसेच एहसान शेख, तौफिक शेख, गायत्री, जयशुदा, भूमिका शर्मा, शबनम, सनम, जफिरा, रितिका, महक तसेच तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.  

लोकशाही मूल्ये आणि जागरुकतेचा प्रसार करण्यासाठी अशा स्पर्धा प्रभावी ठरत असल्याचे मत सहभागी व प्राध्यापकांनी व्यक्त केले.