चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 11/10/2025 रोजी अहिल्या भवन अप्सरा लॉन्स जवळ हुडकेश्वर रोड नागपूर येथे कोजागिरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यामातेचे महादेवराव पातोंड, मधुकरराव काळमेघ, विठ्ठलराव निघोट,सदाशिवराव पुनसे तसेच तुफान एक नशा या पिक्चरचे निर्माते धनराज हरडे, चीफ ॲडव्हायझर महीला मंडळ अध्यक्ष वंदना विनोद बरडे तथा सामाजिक कार्यकर्ते व भावी नगरसेवक श्यामजी थोरात तसेच या पिक्चरचे नायक प्रेम धीराल व नायीका नगीना यांच्या हस्ते पूजन करून हार व पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर महिला भगिनींनी शंकर पार्वती अर्थात भुलाबाईची स्थापना करून भुलाबाईची ( बाहुल्यांची) गाणी, स्तवन व आरती करून पूजा अर्चना केली.
या नंतर सौ.सरस्वती ताई पातोंड व सौ.रंजना ताई भागवत व कुमार स्मयंक होपड यांनी गीत /भावगीत सादर केले. व सामाजिक कार्यकर्त्या वंदना बरडे, ज्योती कापळे,अश्विनी उरकुडे, दिपाली घुरडे, संजिवनी घुरडे ,अनिता त्रिकुट, रीना अवजे, विद्या सोनाग्रे, अर्चना वसतकार, कामिनी तवले, मिनाक्षी लोही, स्मिता तांबडे,विनिता पुनसे,इत्यादी भगिनींनी विविध खेळाचे व रास गरबाचे सादरीकरण करून उपस्थित समाज बांधव, भगिनींचा आनंद द्विगुणित केला. सदर कार्यक्रमादरम्यान समाज बांधवांनी शरदाच्या चांदण्यात तयार करण्यात आलेले केशर,मधुर शर्करायुक्त दुधाचा व स्वरूची भोजनाचा मनसोक्त आनंद घेतला. या कार्यक्रमाला जवळपास 150 समाजबांधव,भगिनींची उपस्थिती होती.
आजच्या कोजागिरीच्या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता अनिलजी तांबडे डॉ.विनोद बरडे, शरदराव उरकुडे,रामजी लोही, रामजी सोनाग्रे, सतीशराव होपड व इतर समाज बांधवांचे मोलाचे सहकार्य मिळाले
कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व समाज बांधवांचे आभार महादेव राव पातोंड साहेब सचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती नागपूर यांनी व्यक्त केले अशा रीतीने कार्यक्रमाची सांगता झाली.


0 टिप्पण्या