चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :-प्रगती महिला समाज संस्था,भंडारा द्वारा संचालित प्रगती महिला कला महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम जयंती निमित्त जागतिक विद्यार्थी दिन आणि वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला.
महाविद्यालय विकास समिती सदस्य श्री. प्रशांतजी देशकर यांच्या मार्गदर्शनात व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्यामकुमार चरडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात भारताचे क्षेपणास्त्र पुरुष, महान वैज्ञानिक आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे भारताचे 11 वे राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून, त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेण्यात आला. या प्रसंगी ग्रंथालय प्रमुख प्रा. डी. डी. चौधरी यांनीही वाचन संस्कृतीचे महत्त्व विशद करताना, ग्रंथालयाचा वापर विद्यार्थिनींनी जास्तीत जास्त प्रमाणात करावा असे आवाहन केले.
वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने महाविद्यालयात मराठी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. मराठी विभाग प्रमुख डॉ. जयश्री सातोकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी अभ्यास मंडळाचे कार्य आणि उपयुक्तता सांगितली. कु. पूनम घनश्याम भेदे हिने मराठी अभ्यास मंडळाचे महत्त्व विशद केले. कार्यकारिणीत अध्यक्ष कु. अश्विनी वडतकर, उपाध्यक्ष कु. स्नेहा कुंभलवार, सचिव कु. पुनम घनश्याम भेदे, सदस्य कु.साफीया शोख, कु.समीक्षा फुलबांधे, कु.पिंकी दिघोरे, कु.तुलसी मेश्राम यांच्या समावेश आहे. कार्यक्रमाचे संचलन डॉ. क्रिष्णा पासवान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. जी. एन. कळंबे, डॉ. ज्ञानेश्वर दिवसे, प्रा. पी. एस. देशमुख, डॉ. शिल्पा बन्सोड, श्री. संजय वानखेडे यांनी अथक परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या