Ticker

6/recent/ticker-posts

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी मा. कुणाल धनवे तर उपाध्यक्ष पदी मा. निलेश वारे यांची बिनविरोध निवड....


सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- डोणगाव ता. जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.
त्यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष मा. कुणाल कांतीलाल धनवे तर उपाध्यक्ष पदी मा. निलेश संदीपान वारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची  सहविचार सभा जि .प .शाळा - डोणगाव येथे सकाळी 10.00 वाजता घेण्यात आली. सभेमध्ये सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला .
     शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्याची माहिती मा. गंभीरे सर यांनी दिली .शाळा विकासात समितीचे सहकार्य सांगितले . अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकच नाव आले . त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध निवड झाली . त्यानंतर भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर ए .पी .जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. 
त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या