हक्कासाठी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात पाठविले,
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संपूर्ण सुनावणी ऐकल्यावर हक्क मिळवून देण्यासाठी प्रकरण आदेशा करीता ठेवले आहे.
अपीलार्थी विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांची माहिती
सविस्तर असे की आज माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील में कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी तसेच में कर्नाटक एम्टा कंपनी व बेलोरा येथील में अरबिंदो कंपनी, व कोरपना तालुक्यातील में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी विरुद्ध विनोद खोब्रागडे व समंधीत शेतकरी यांनी कायदेशीर बोगस फेरफार विरुद्ध अपील दाखल केली होती,
त्यावर आज सुनावणी झाली, में कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी व में कर्नाटक एम्टा कंपनी व त्यांचे वकील मंडळी नोटीस मिळुनही उपस्थित का झाली नाही.
अवैध कोळशाचे उत्खनन मागील अनेक वर्षांपासून बोगस फेरफार करून कशी काय करत आहे.
असा प्रश्न अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात उपस्थित केला आहे.
में अरबिंदो कंपनी तर्फे वकील मंडळी उपस्थित होऊन दिल्ली उच्च न्यायालयाचा रिठ पीटीशन केस नंबर ५७६१/२०२१ टाकून तलाठी यांनी फेरफार घेऊन एका दिवसात मंडळ अधिकारी यांनी शहानिशा न करता त्या बोगस नोंदी प्रमाणित केल्या कंपनीचे नागपूर उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील उत्तर देताना म्हणतात की तलाठी यांनी टायपिंग मिस्टेक मध्ये फेरफार घेतांना चुक झाली.
मग चुकीचे फेरफार आधारे में अरबिंदो कंपनी मागील तीन वर्षांपासून अवैध कोळशाचे उत्खनन कसे काय करीत आहे.
में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी विरुद्ध अपर विभागीय आयुक्त नागपूर यांनी विनोद खोब्रागडे व इतर शेतकरी यांनी दाखल केलेल्या अपीलावर न्याय मिळाला,व हक्कासाठी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात पाठविले अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेऊन प्रकरण हक्कासाठी आदेशाकरीता ठेवले आहे.
कुंसुबीच्या ख-या२४ आदीवासीनां ४२वर्षानंतर न्याय मिळाला आता हक्क सुद्धा मिळनार असल्याचे अपीलार्थी विनोद खोब्रागडे यांनी सांगीतले.


0 टिप्पण्या