चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : स्थानिक श्री. संत नगाजी महाराज भवन येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिरोमणी श्री संत नगाजी महाराज यांचा जयंती महोत्सव एक दिवसीय कार्यक्रमात विविध कार्यक्रमाने साजरा करण्याचे आयोजन.
या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे दिनांक 27/ 10/ 2025, रोज सोमवारला पहाटे सकाळी:-6-00 वाजता
नगाजी महाराज सभागृहाच्या जवळील ग्राम स्वच्छता अभियान, सकाळी:-7-00 वाजता सामुदायिक ध्यान, मिननात महाराज पेटकर यांच्या हस्ते, सकाळी:-8-00 वाजता
श्री संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेची व श्री. ची घटस्थापना (पंढरीनाथ आंबेकर महाराज, रा.पिपरी) यांच्या हस्ते. यानंतर संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजा व अरच्या व आरती, सकाळी-8-30 ते 11-00 वाजेपर्यंत गुरुदेव सेवा भजन मंडळ कोरपना यांचे भजन, सकाळी 11 वाजता
श्री संत नगाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भाषणे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सत्कार समारंभ, दुपारी:-12-00 वा
श्री संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन व दहीहंडी काला दुपारी:-2-00 वाजता. महाप्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी:-5-00 वाजता.
सामुदायिक प्रार्थना व समारोप कार्यक्रम.
वरील कार्यक्रमास समस्त नाभिक बंधु व सर्व भावीक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री संत सेनाजी व नगाजी महाराज मंडळ, कोरपना, श्री संत नगाजी महाराज कमिटी, कोरपणा, नाभिक महिला मंडळ, कोरपना व सलून असोसिएशन कोरपणा यांनी केले आहे.


0 टिप्पण्या