Ticker

6/recent/ticker-posts

मासळ नियतक्षेत्रा तील अवैधरित्या वाळू( रेती ) वाहतूक ट्रॅक्टर जप्त

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती : वनपरिक्षेत्रातील मासळ येथील अवैधरित्या वाळु )(रेती )उत्खनन व वाहतुक करणाऱ्यावर वनविभागाने कारवाई करीत ट्राक्टर जप्त केले आहे.ही कारवाई रविवार दि.२६ ऑक्टोंबरला सकाळी ०६-३० भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी के. डब्लू धानकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहिती नुसार मासळ येथील संरक्षित वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ८९६ नियतक्षेत्र मासळ मधिल नाल्यातील अवैधरित्या वाळु उत्खनन सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यावर तात्काळ धाड टाकण्यात आली असता रुपेश नामदेव उरकुडे रा. भद्रावती यांच्या मालकिचे  महिन्द्रा ट्रॅक्टर (एम एच ३३ एफ २०३८) लाल रंगाचा बिना क्रमांकची ट्रॉलीद्वारे वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळले हे वाहन चालकाके वाळू उत्खनन व वाहतूक परवानाचे कोणतेही कागदपत्रे नसल्याचे दिसुन आले. परिनामी वनक्षेत्र अधिकारी धानकुटे यांनी तात्काळ ट्रॉक्टर व ट्रॉली जप्त करुन संबंधितावर वन गुन्हा नोंदविला यावेळी क्षेत्र सहाय्यक व्ही आर ठाकरे (चोरा), एस आर कुळमेथे वनरक्षक (मासळ ) यांनी मोहिम यशस्वी केली.तसेच अवैधरित्या वाळू (रेती) उत्खनन टाळण्याच्या दृष्टीने यापुढेही शोधमोहिम चालू राहिल असे सांगीतले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या