Ticker

6/recent/ticker-posts

वाढवणा पोलिसांचा डोंगरशेळकीत रन फाॅर युनिटी कार्यक्रम संपन्न



चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनी म्हणजे ३१ आक्टोबर रोजी जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे रन फाॅर युनिटी म्हणजे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.
दि.३१ रोजी एकता दिनाचे आणि पटेल यांच्या जयंतीचे औचित्याने उदगीर तालुक्यातील वाढवणा (बू.) पोलिस ठाण्यातर्फे तालुक्यातील मौ. डोंगरशेळकी येथील शेतकी काॅलेज येथील मैदानात रन फाॅर युनिटी हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
जिल्हा पोलिस प्रमूख अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने रन फाॅर युनिटी,एक दौड देश की एकता और अखंडता के लिए,यासाठी दि.३१ रोजी सपोनि. सुनील गायकवाड यांच्यासह वाढोना ठाण्यातील महिला-पुरुष पोलिसांची १ टीम ७वा.डोंगरशेळकीच्या काॅलेज आॅफ अॅग्रीच्या मैदानावर हजर झाली.यावेळी पोलिस कर्मचारी सर्वश्री संजय दळवे,संजय कलकत्ते, टी.टी.बळदे,शिवाजी केंद्रे,रंगवाळ, अक्रम उजेडे,शेख,दत्ताञ्य वाडकर यांच्यासह काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी व गुरुजनांनी सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या