सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाची प्रभाग तीन मध्ये सुरज निमोणकर यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांनी पूर्ण प्रभाग पिंजून काढला आहे. होम टू होम प्रचाराच्या पध्दतीमुळे प्रभाग मधील अनेक समस्यांची उकल झाली आहे. नागरिकांनी आपल्या समस्या सांगून नगरपरिषद सोयी सुविधा पासून कसे वंचित राहिला आहे तसेच घरातला उमेदवार म्हणून सुरज निमोणकरच्या उमेदवारीला प्रथम पसंती दिली आहे. या निवडणुकीसाठी त्याचे सर्व मित्र, नातेवाईक यांनी झोकून दिले असल्याने विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.
जामखेड नगरपरिषदेची उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया संपल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग तीन मधून ओबीसी पुरूष जागेतून सुशिक्षित तरूण उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. सुरज निमोणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह मिळाले ते पहिल्यापासून मतदारांच्या परिचीत आहे. कोणतेही राजकीय पाठबळ नसताना व पक्षाने दाखवलेला विश्वास यामुळे या तरूण उमेदवाराने विरोधी उमेदवार लक्ष्मी समोर कोण आहे हे न पाहता. प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन तुम्ही मला संधी द्या, मी तुमच्यातलाच असून तुमच्या भावनांचा आदर करून तुमच्या सुखदुःखात व समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे वचन दिले व आपला वचननामा विकासाच्या दृष्टीने व दहशत मोडून काढून प्रभागाचे नंदनवन करण्यासाठी व शहरातील प्रभाग तीन मॉडेल करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या संकल्पनेतून प्रभागात निधी आणून विकासाची ग्वाही दिली. प्रभाग तीन मधील नागरिकांनी सुरज निमोणकर यांच्या वर विश्वास दर्शवला आहे.
नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर यांनी आपल्या कारकीर्दीत केलेली विकासकामे, पाणीटंचाई व कोरोना काळात केलेल्या कामाची पावती आहे. त्यांच्या
सौभाग्यवती सुवर्णा निमोणकर निवडणूक रिंगणात उतरले असून मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रभाग तीनमध्ये सुरज निमोणकर यांनी मतदारांच्या घेतलेल्या गाठीभेटी व प्रभागाच्या असलेल्या समस्या जाणून घेतल्या. सदर प्रभाग विकासापासून किती वंचित राहीला आहे. नगरपरिषदेकडून मुलभूत प्रश्न सुटले नाहीत याची प्रचिती आली आहे.
दोन आमदार नगरपरिषद जिंकण्यासाठी तळ ठोकून बसले आहे मग समस्या सुटल्या नाहीत असा प्रश्न नागरिक करत आहे. सुरज निमोणकर यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत या सर्व समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेत निवडून देण्याची संधी मतदारांनी द्यावी असे आवहान केले आहे. सुरज निमोणकर यांना मतदारांचा मिळणारा पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे मतदारातून बोलले जात आहे.


0 टिप्पण्या