Ticker

6/recent/ticker-posts

निळवंडे परिसराच्या विकासाला नवे बळ


चित्रा न्युज प्रतिनिधी 
अहील्यानगर :- निळवंडे धरणाच्या सांडव्याखालील निळवंडे–कोकणेवाडी रस्त्यावर उच्यास्तरीय पुलाच्या कामासाठी सुमारे ₹८ कोटींचा निधी जलसंपदा विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण पुलामुळे परिसरातील दळणवळण अधिक सुरक्षित, सुकर आणि वेगवान होणार आहे.

या पुलाच्या कामाचे भूमिपूजन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी निळवंडे धरण परिसरातील विकासकामांचा आढावा घेत निसर्ग पर्यटनाला चालना देऊन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रकल्प राबविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

या प्रसंगी आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सीताराम गायकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या