जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्सचे निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदूरबार :- अक्राणी तालुक्यातील खडकला, खरवड इत्यादी गांवातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाणी पुरवठा विहीर बांधकामाचे अनुदान (पैसे) लाभार्थी शेतक-यांस मिळाले नाहीत. विहिरीचे अनुदान- पैसे लाभार्थ्यांस तात्काळ मिळावेत, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदूरबार यांच्याकडेच एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,नवा ठाकरे,वसंत वसावे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसीलदार, तहसील कार्यालय अक्राणी जि.नंदुरबार यांनी मा.उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांना दिनांक ०३/०३/२०२५ रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाणी पुरवठा विहीरीची तपासणीबाबत पत्र पाठवले आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अंतर्गत अक्राणी तालुक्यातील या खडकला, खरवड इत्यादी गांवात पिण्याचे पाणी पुरवठा विहीरीचे काम पूर्ण होऊन ३ वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला आहे व बांधकामाची तपासणी सुद्धा झालेली आहे.परंतू अद्यापही संबंधित लाभार्थी शेतक-यांस विहीर बांधकामाचे अनुदान- पैसे मिळालेले नाहीत, तरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पिण्याचे पाणी पुरवठा विहीर बांधकामाचे लाभार्थ्यांस तात्काळ अनुदान मिळावे,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.विहीरीचे अनुदान न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.


0 टिप्पण्या