चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :- शहादा तालुक्यातील मोदीलाल पाडा येथे दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी बिरसा फायटर्सच्या ३७६ व्या नवीन शाखेचे बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले.गाव शाखा अध्यक्ष पदी लालसिंग तडवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.लालसिंग तडवी,किसन वळवी,संजय ठाकरे, अमरसिंग वळवी,कोट्या तडवी,रायसिंग वळवी,टेडग्या वळवी,किसन वसावे, लीलाबाई तडवी, उषाताई ठाकरे ,तारकाबाई ठाकरे, इत्यादी कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत निवड करण्यात आली.
आदिवासी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी, हितासाठी,प्रगतीसाठी, आदिवासी,अस्मिता, अस्तित्व, जल,जंगल, जमीन संरक्षणासाठी,आदिवासी संस्कृती, संविधानिक हक्क व अधिकार, आरक्षण वाचवण्यासाठी ,आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचारांविरोधात प्रशासनास निवेदन देणे,प्रसंगी मोर्चा,आंदोलन इत्यादी लोकशाही मार्गाने लढा देणे ,अशा आदिवासींच्या एकूणच विषयावर बिरसा फायटर्स संघटना काम करते.मोदीलाल पाडा येथील आदिवासी बांधवांच्या रस्ता,शाळा,अंगणवाडी, वीज,पाणी,वनदावे इत्यादी प्रश्न बिरसा फायटर्सच्या माध्यमातून आम्ही सोडवण्यासाठी काम करू.नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा,अशा शब्दांत सुशिलकुमार पावरा यांनी आदिवासी बांधवांना संबोधित केले.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव बारक्या पावरा सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


0 टिप्पण्या