Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासन निवडणुक कामात व्यस्त असल्यामुळे कायद्याच्या आयचा घो!!असे म्हणत


हाळी-हंडरगुळीत अल्पवयीन चालक मस्त

चित्रा न्युज प्रतिनिधी 
 हंडरगुळी :—संबंधित खात्यातर्फे दरवर्षी जानेवारीत वाहतूक सुरक्षा सप्ताह राबविला जातो.यात वाहतूक नियमांची रितसर माहिती देण्याबरोबरच वाहतूक नियम मोडणा-यांसह अल्पवयीन चालकांवर कोण,कोणत्या कलमान्वये गुन्हा दाखल होतो. याबद्दल माहिती दिली जाते.
माञ,उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे व राज्यमार्गावर असलेल्या हाळी-हंडरगुळी या गावात आजवर ना वाहतूक सुरक्षा सप्ताह साजरा केला.ना अल्पवयीन चालकांवर कारवाई. यामुळे कायद्याच्या आयचा घो !! म्हणत पोलिसांच्या नाका-डोळ्यांपुढूनच अल्पवयीन चालक दुचाकीसह ४ चाकी वाहनेही वायुवेगाने चालवत असल्याचे आमआदमी सह पोलीसांना ही दिसतात.तरीही आजवर कारवाई तर नाहीच नाही.पण साधा धाक ही खाकीने दाखविला नाही.याचे हाळी हंडरगुळीच्या आम आदमीला नवल वाटते.तसेच संबंधित यंञणा जि.प. व पं.स. निवडणुकीत व्यस्त असल्याने चालक मंडळी माञ मस्त दिसतात.तेंव्हा या ठिकाणी *कायदा अभी जिंदा है,*  तसेच *कानुन के हाथ लंब्बे होते है* याचा प्रयोग कोण व कधी दाखविणार?याकडे आम अदमीचे लक्ष लागलेय.भारतीय संविधानिक नियम कायद्यानुसार १८ वर्षावरचे मुले सज्ञान मानले जातात.तसेच मतदानाचा हक्क व गाडी चालवायचे लायसन्स हे पण १८ वर्षानंतरच प्राप्त होते. माञ,हा संवैधानिक कायदा असूनही हा कायदा मिशाही न फुटलेले शेकडो बालक चालक बनुन२चाकी सह ४चाकी गाड्या सुसाट तसेच स्व:तासह इतरांचा ही जीव धोक्यात घालून धोकादायकरित्या चालवत असल्याचे गल्ली,बोळात व राज्यमार्गावर ही दिसतात.आणि आपल्या पोराला गाडी नीट येईना.तसेच आली तरीही त्याला वाहन चालवायला देणे म्हणजे कायदा हातात घेणे आणि पोरासह इतरांचे जीवन धोक्यात घालणे.याची स्पष्ट जाणीव असूनही असंख्य पालक मंडळी मुलाच्या गाडीवर मागे बसत आणि मज्जा घेत असतात.
हे विशेष...!!
तेंव्हा प्रशासनाने अशा एखाद दुस-या पालकांवर कारवाई केली तर आणि तरच इतरांवर कायद्याचा धाक बसेल.पण प्रशासनातच कारवाई करण्याचा धाक नसल्याने अल्पवयीन चालकांसह त्यांचे पालक मस्त दिसतात.
कारण,आजवर येथे ना कुणी कारवाई केली.ना याबाबत जनजाग्रती केली. राज्यमार्ग,महामार्ग येथे थांबून संबंधित अधिकारी व कर्मचारी जनजाग्रती करतात.तसेच शाळा-काॅलेज मध्ये जाऊन याची माहिती देतात परंतू,जेंव्हा कायदा निघाला तेंव्हा पासून अशी कोणती माहिती कुणीही दिली नाही.तसेच कुणी कारवाई पण केली नाही.अशी कुजबूज जेष्ट मंडळी मधून ऐकू येते.

.......अल्पवयीन चालकांबाबत काय म्हणतोय कायदा.....
   अल्पवयीन चालकांवर मोटार वाहन कायदा कलम ३,४,५, १८०,१८१ तसेच j.j.act नुसार कडक कारवाई केली जाते. आणि यामध्ये ५ हजारा पासून ते २५ हजारांपर्यंत दंड ही केले जाते.प्रसंगी अल्पवयीन चालकांच्या बापाला पण शिक्षा होऊ शकते.माञ,हे करायला संबंधित यंञणेत धमक लागते. अशी कुजबूज *जयप्रकाश* च्या बाकड्यावर बसलेले आम आदमी करत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या