चित्रा न्युज प्रतिनिधी
तेल्हारा – समाजातील विविध घटकांशी संवाद साधत जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असलेले रोहित हीवराळे हे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका प्रसिद्धीप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
तेल्हारा तालुक्यात विविध कार्यक्रम, बैठका आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांना मार्गदर्शन करणे, सामाजिक जाणीव निर्माण करणे आणि स्थानिक प्रश्नांवर आवाज उठवणे यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग दिसून येतो.
जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यावर त्यांचा भर असून, समाजहितासाठी सातत्याने कार्य करण्याचा त्यांचा निर्धार आहे.


0 टिप्पण्या