Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड पोलीसांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचे लग्न थांबविण्यात यश.....


चित्रा न्युज प्रतिनिधी 
नांदेड :-दि.25/04/2026 रोजी सोमेश कॉलनी, कला मंदिराच्या पाठीमागे एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावले जात असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदर विवाह थांबविण्यात यश मिळविले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय बुलंगे व त्यांच्या स्टाफला तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आले. तेथे पोहोचल्यावर हळदीचा कार्यक्रम सुरू असल्याचे निदर्शनास आले असून पुढील दिवशी लग्न होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र पोलिसांची उपस्थिती लक्षात येताच मुलगा, मुलगी व नातेवाईक घटनास्थळावरून निघून गेले.

त्यानंतर संबंधित मुलीचे वडील यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांच्याकडे सध्या विचारपूस सुरू आहे. सदर मुलगी ही अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे

प्राथमिक माहितीनुसार, लग्न लिंबगाव येथील गोपालचावडी, कृष्ण मंदिर येथे दिनांक 26/04/2026 रोजी सकाळी 10:00 वाजता होणार होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे व वेळेवर हस्तक्षेपामुळे हा विवाह रोखण्यात आला. मंदिरातील पुजाऱ्याशी संपर्क साधून याबाबत खात्री करण्यात आली आहे. सदर प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईत API बोधनकर (पो.स्टे. लिंबगाव), पोउप सुनिल बुलंगे तसेच पोलीस कर्मचारी नागरगोजे, मडिकुंवार, बनसोडे व इतर स्टाफ यांनी सहभाग घेतला.

सदरची कामगीरी करनारे अधिकारी व अंमलदार यांचे मा श्री अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक, नांदेड यांनी कौतुक करुन अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या