Ticker

6/recent/ticker-posts

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली...

पारस जेन्टस पार्लर सलून दुकानमध्ये  जयंती साजरी करण्यात आली.....

चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा : शेगांव (बू) येथील सूपरिचित असलेले नाभिक समाजचे कार्यकर्ते व तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी होमराज घुमे तथा पारस जेट्स पार्लर दुकानांमध्ये मेसा येथील बाबासाहेबांचे विचारांचे कैवारी लोकेशभाऊ राऊत यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती (१४ एप्रिल) समता, ज्ञान आणि सामाजिक न्यायाचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. संविधानाचे शिल्पकार आणि शोषित-पीडितांचे कैवारी बाबासाहेबांनी 'शिका, संघटित व्हा,संघर्ष करा' हा मूलमंत्र दिला. त्यांचे विचार,स्त्री - शिक्षण, कामगार हक्क आणि जातिभेद निर्मूलनासाठी केलेले कार्य आजही समाजाला प्रेरणा देते या रैलीसाठी थंड पिण्याच्या पाण्याची आणि खाऊ वाटप करण्यात आले.

 यावेळी उपस्थित  शेंगाव पोलीस स्टेशनचे जिल्हा शांतता कमिटीचे सदस्य उमेशभाऊ माकोडे नाभिक समाजाचे कार्यकर्ते धनराज भाऊ घुमे शेगांव पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई दिनेश ताटेवार, माळी समाजाचे नेतृत्व करणारे तथा माळी समाजाचे अध्यक्ष  सचिनभाऊ फुलकर, बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी  विरेद्र घडले तसेच वरोरा तालुका संघटक सचिनभाऊ रासेकर, किसनजी पाडेवार प्रकाशभाऊ खांदारे, प्रकाशभाऊ सोनार्थी, व राजूभाऊ बोकडे इत्यादि मान्यवर यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या