Ticker

6/recent/ticker-posts

अशा भोंदू माणसाने महाराजांवर भाष्य करण्याची हिंमत केलीच कशी?

मनुवादी भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताना बघत का राहिली. -- आ. विजय वडेट्टिवार यांचा भाजपवर प्रहार


चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्तेत बसले आहेत काय? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्री विरोधात वडेट्टीवार यांनी जोरदार प्रहार केला. ज्याला महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही, ज्याची अक्कल कवडीची आहे, अशा भोंदू माणसाने महाराजांवर भाष्य करण्याची हिंमत कशी केली? छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते तर स्वराज्य निर्माण झाले नसते. सत्तेत बसलेले लोक या बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच या भोंदूंची मस्ती वाढली आहे आणि ते महाराजांचा अपमान करतात असे वडेट्टीवार म्हणाले. जेव्हा या भोंदूने महाराजांचा अपमान केला तेव्हाच मुख्यमंत्र्यांनी का थांबवले नाही? नंतर बोलून उपयोग नाही. तसेच, संजय गायकवाड सारखे शिवप्रेमी आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? आता का बोलत नाही,शिव्या देत नाही असा सवालही वडेट्टीवार यांनी विचारला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या