Ticker

6/recent/ticker-posts

सिलंबममध्ये चंद्रपूरचा डंका 12 सुवर्णपदके, 5 खेळाडू मलेशियाला


राष्ट्रीय स्पर्धेत आयुषी स्पोर्ट्स अकादमीचे घवघवीत यश : विदर्भातून प्रथमच इंटरनॅशनलला निवड



चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपूर : प्राचीन भारतीय शिवकालीन शस्त्र कला क्रीडा प्रकार ‘सिलंबम’ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये आयुषी स्पोर्ट्स अकादमी, चंद्रपूर व आयुध स्पोर्ट्स अकादमी, भद्रावतीच्या खेळाडूंनी तब्बल 12 सुवर्ण, 3 रौप्य व 2 कांस्य पदके पटकावली आहेत. या दमदार कामगिरीमुळे विदर्भाच्या इतिहासात प्रथमच चंद्रपूरच्या 5 खेळाडूंची मलेशिया येथे ऑगस्ट 2026 मध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल सिलंबम चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.
सिलंबम स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया व सिलंबम स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत चंद्रपूरच्या खेळाडूंनी सिंगल लाठी रोटेशन, लाठी काठी फाईट, तलवार रोटेशन, सुरुल रोटेशन, एम्प्टी हॅण्ड काता या प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन केले. दीक्षांत दुर्गराज रामटेके, 3 सुवर्ण, 1 रौप्य दीक्षांत महेंद्र सोनारकर, 4 सुवर्ण हर्ष राजुरकर,  3 सुवर्ण
मित राजुरकर, 1 सुवर्ण, 2 रौप्य अर्णव बाबा कोटनाके, 1 सुवर्ण, 2 कांस्य
 
चंद्रपूर डिस्ट्रिक्ट अमेचुअर सिलंबम असोसिएशन व आयुषी स्पोर्ट्स अकादमी मागील 5 वर्षांपासून जिल्ह्यात सिलंबम या शिवकालीन क्रीडा प्रकाराचा प्रसार करत आहे. या स्पर्धेपूर्वी विदर्भ प्रमुख मास्टर दुर्गराज एन. रामटेके यांनी 19 एप्रिल 2026 रोजी अंकुर विद्या मंदिर स्कूल, आयुध निर्माणी चांदा वसाहत, भद्रावती येथे विदर्भ विभाग स्तरीय सिलंबम ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पला इंटरनॅशनल सिलंबम फेडरेशन, मलेशियाचे मान्यताप्राप्त कोच संजय बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. 
खेळाडूंनी या यशाचे श्रेय विदर्भ प्रमुख दुर्गराज रामटेके, असोसिएशनच्या अध्यक्षा शीतल रामटेके, सचिव बी. एल. करमनकर, टीम मॅनेजर अशोक कामडे, करण डोंगरे, संजय माटे, राकेश राय, ASA सचिव आयुषी रामटेके तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल अमोल बदखल, कृष्णा रामटेके, सुमंत सिंग, गौतम भगत, महेंद्र सोनारकर, विकशील राजुरकर, बाबा कोटनाके, मयुर कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

------------------------------------
अभिमानास्पद! चंद्रपूरच्या सिलंबमपटूंनी राष्ट्रीय स्पर्धेत 12 सुवर्णपदकांसह इतिहास रचला. दीक्षांत, हर्ष, मित, अर्णव सह 5 खेळाडूंची मलेशिया इंटरनॅशनल स्पर्धेसाठी निवड. विदर्भातून पहिल्यांदाच! आयुषी स्पोर्ट्स अकादमीचे घवघवीत यश. सर्व चॅम्पियन्सचे अभिनंदन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या