चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : येथील दिनांक १/०५/२०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हॉटेल Sunny Point, येथे युवासेनेच्या वतीने BLA (Booth Level Agent) नेमणूक करण्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण व उत्साहपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य तथा युवासेना चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख हर्षल भाऊ शिंदे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ मजबूत करण्यासाठी BLA नेमणूक ही निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच संघटन अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख आलेख भाऊ रट्टे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी स्थानिक पातळीवर संघटन वाढीसाठी ठोस दिशा देत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
तसेच या बैठकीस युवासेना जिल्हा संघटक सुमित हस्तक, वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख मुनेश्वर बदखल, युवासेना शहर प्रमुख राज चव्हाण, तालुका प्रमुख महेंद्र भोयर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान BLA नेमणुकीसंदर्भात सखोल चर्चा करून पुढील रणनीती निश्चित करण्यात आली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने युवासैनिक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून संघटनात्मक बळकटीचे दर्शन घडवले.


0 टिप्पण्या