Ticker

6/recent/ticker-posts

खराशीत पंचायत राज अभियान चमूची हजेरी

गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

 
चित्रा न्युज प्रतिनिधी 
पालांदूर : मुख्यमंत्री ग्राम समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गट ग्रामपंचायत खराशी येथे 'चमू' (मूल्यमापन पथक) दाखल झाले. ग्रामपंचायतीच्या विविध कामांचा आढावा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून कामकाजाचे मूल्यमापन करून त्यांना अधिक सक्षम व पारदर्शक
करण्यासाठी प्रेरित केले.उपस्थित चमूला गावकऱ्यांनी गावाची करून दिली ओळख यात माहिती देताना गावांची शाळा डिजिटल व महाराष्ट्रात नावलौकिक असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तर पाहणी अंती शाळेचे परिसर,शैक्षणिक दर्जा व भौतिक सुविधाचा आढावा दिला.

ग्रामपंचायतींच्या इमारती पासून ग्राम पंचायत अंतर्गत दस्तावेज तपासणी आणि पंचायत राज अभियान अंतर्गत खराशी येथे ग्रामपंचायत कार्यालयात एकत्रीत आलेली चमू व
वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्य करीत ग्रामपंचायतच्या
पदाधिकाऱ्यांनी आपला उत्तम प्रतिसाद दिला या अभियानाच्या माध्यमातून गावाची उन्नतीचे ध्येय असल्याचे सरपंच योगराज झलके यांनी स्पष्ट केले. गावातील भौतिक सुविधा उपलब्ध असल्यातरी पुन्हा यात सुधारणा व नवनवीन उपक्रम राबवून गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात यशस्वी रित्या प्रयत्नशील असल्याचे मत ग्रामस्थानी उपस्थित चमूला माहिती दिली.गावाला महाराष्ट्रात नावलौकिक करणे आणि त्याप्रकारे गावविकासाकडे वाटचाल असल्याचे उपस्थित चमुनी शाब्दिक मत व्यक्त केले.

पथकाने वरिष्ठांची
ग्रामपंचायतीतील प्रशासन,
उपस्थिती, विविध
नियोजनांची माहिती
कामांची पाहणी,
स्वच्छता, पाणीपुरवठा,उपक्रम बाबतीत माहितीचे दस्तावेज  पुरविली.दैनंदिन
विकासकामे, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट यंत्रणा, सांड पाणी व्यवस्थापन,सोलर पाणी व्यवस्थापन,गावातील CCTV तपासणी,आपले सरकार सेवा केंद्र संगणक संचालक,डिजिटल
नियोजन व मांडणीचे
नोंदी तसेच शासनाच्या
विविध योजनांची
अंमलबजावणी यांची पाहणी केली.

खराशी सरपंच योगराज झलके व ग्रामचायत सदस्यगण यांनी
आयोजन व नागरिकांच्या सहभागाबाबत ही माहिती दिली .ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी
कामकाजात पारदर्शकता वाढून विकासाला गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दस्तावेज नोंदी, करसंकलन,
 पथकास आवश्यक ती माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून दिली. गावातील विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मूल्यमापनामुळे ग्रामपंचायतीच्या कार्यप्रणालीत व विकासात्मक वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले.प्रसंगी
सरपंच योगराज झलके, उपसरपंच टकेश्वर मेश्राम, सदस्य चेतना झलके, संतोषी सती मेश्राम, पल्लवी जगनाडे, दिनकर झलके, नरेंद्र आथोडे, ग्राम पंचायत अधिकारी भूतमांगे साहेब, गावचे माजी सरपंच सुभाष डोके, माजी सरपंच पुरुषोत्तम फटे, शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष दामोदर शेळके, हेमराज शेंडे, भूपेश झलके, मोहित झलके , जयंत गोरे सामाजिक कार्यकर्ता, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या