Ticker

6/recent/ticker-posts

अकलूजमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय; नगरपरिषदेचा रस्ता मोकळा करण्याचा निर्णय कौतुकास्पद

चित्रा न्युज प्रतिनिधी 
अकलूज : शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन अकलूज नगरपरिषदेने व्यापारी संकुलासमोरील रस्त्यावर लावलेले अडथळा ठरणारे बोर्ड हटवून रस्ता मोकळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
अलीकडेच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथील सांस्कृतिक भवनात नागरिकांसोबत वाहतूक समस्येवर बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या तसेच प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
त्याच पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे बोर्ड हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईमुळे रस्ते अधिक मोकळे झाले असून वाहतुकीचा वेग सुधारण्यास मदत होत आहे.
नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत नगरपरिषदेच्या पुढाकाराचे कौतुक केले असून, भविष्यातही अशाच प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या