चित्रा न्युज प्रतिनिधी
लातुर :-वाढवणा बु.परिसरात होणारे अपघात.त्यात जाणारे बळी पाहता वाढवणा बु.पोलिसांनी हेल्मेट वापरासाठी जनजाग्रती करण्यासाठी हेल्मेट तुमच्यासाठी पण,कुंटूंबांसाठी पण.. हा एक प्रभावी,स्तूत्य व जनहितकारी उपक्रम सुरु केला असून उदगीर-हाळी-अहमदपुर रोडवर हेल्मेट तुमच्यासाठी पण,कुटूंबियांसाठी पण.. दुर्घटना पर लगेगा ताला,जब पहनोगे सुरक्षा की माला.हा संदेश असलेले व अपघात झालेले वाहन उभा केल्याचे दिसते.
उदगीर-हाळी-अहमदपुर हा आंन्ध्र,कर्नाटक, तेलंगणा या 3 परराज्यांना जोडणारा सुस्थितीतील महामार्ग आहे माञ,कांही वाहनधारकांची चुकी त्यांच्यासह प्रवाशांच्या जीवावर उठते.आणि यात अनेक निष्पापांचे हकनाक प्राण गेल्याचे दिसते.
प्रशासनाने रस्ता सुरक्षा अभियान राबवुनही येथे अपघाताचे प्रमाण कमी न होता ते वाढतच चालल्याचे दिसते.मोटार वाहन कायदा पायदळी तुडवित वाहने चालविणे.तसेच गतिरोधक नसणे.आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे अल्पवयीन मुले गाडी चालवीणे.या कारणांमुळे हा महामार्ग 'नरक मार्ग" बनत चाललाय म्हणुन या रोडलगत अपघातग्रस्त 1 बाईक वाढवणा पोलिसांनी एका लोखंडी अॅंगलवर उभा केल्याचे दिसते.आणि वरील मजकुर असलेले बॅनर ही लावलेले दिसते.
जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक सुनिल गायकवाड यांनी अपघातग्रस्त दुचाकीचा वापर करुन वाहन चालकांना 1 जिवंत संदेश दिला आहे.वाढवणा बु. पोलिसांनी येथून उदगीर जाणा-या रोडलगत लोखंडी स्टॅंड उभारुन त्यावर बाईक उभी केली.
'सर सलामत तो पगडी पचास'
रस्ते अपघात होऊ नये,या करीता शासन, प्रशासन नेहमी विविध अभियानातुन वाहनधारकांना होशियार करते.
कारण,रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचे कुटूंबिय मोठ्या संकटात सापडते, उध्वस्त होते.हा मेसेज वाहनधारकांच्या थेट डोक्यात जावा.आणि सर्व चालकांनी हेल्मेट वापरावे.तसेच कायद्याचे पालन करुन वाहन चालवावे.ही भावना अपघातग्रस्त बाईकt रोडलगत उभी करण्यामागे आहे.
सुनिल गायकवाड,सपोनि,वाढवणा पो.स्टे.ता.उदगीर..
हा मार्ग चांगला असल्याचा गैरफायदा घेणा-यांमुळे तसेच वाहतुक नियमांचे पालन न करणा-यांमुळे रस्ते अपघात होतात.त्यावर कारवाई करुन तसेच प्राणहानी होऊन सुध्दा फरक पडत नाही.यासाठी प्रत्येक वाहनचालकांच्या मनात स्वत:सह इतरांच्या सुरक्षेबद्दल प्रेम,आपुलकी निर्माण होणे गरजेचे आहे.म्हणुन हेल्मेट तुमच्यासाठी पण,कुटूंबांसाठीv पण..या संदेशातुन हा उपक्रम सुरु केला आहे.
प्रवीण हालसे,पोलिस उपनिरिक्षक,वाढवणा बु.
हेल्मेट तुमच्यासाठी पण,कुटूंबांसाठी पण..
हा उपक्रम चांगला असलातरी ही अल्पवयीन चालक व फटाका सायलेन्सर व हाॅर्नचे काय?
कारण,हाळीहंडरगुळीत फटाका सायलेन्सर व कर्णकर्कश हाॅर्न वाजवणारे व सुसाट वेगात दुचाकी चालविणारे असंख्य बालके(लहान मुले) आहेत. त्यांच्यावर अद्याप कारवाई का नाही?
अशा वाहनधारकांवर कारवाई केल्यावर अपघात व किरकोळ वाद होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. असे मत बालाजी चिंतलवार,व्यापारी यांनी व्यक्त केले.


0 टिप्पण्या