चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षा फेब्रुवारी २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कारला येथील विद्यार्थी राघवेंद्र अंगद सुरोशे यांनी ९०.४० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
राघवेंद्र यांनी आपल्या सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळविले. ते शहरातील राजा भगीरथ विद्यालयाचे विद्यार्थी असून, विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यामुळेच हे यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यशामागे आई-वडील, शिक्षक व कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगताना राघवेंद्र यांनी भविष्यात उच्च शिक्षण घेऊन मोठे अधिकारी बनण्याची इच्छा व्यक्त केली.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार तसेच नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


0 टिप्पण्या