चित्रा न्युज प्रतिनिधी 
अमरावती:-नुकत्याच संपन्न झालेल्या S.S.C Board मार्च 2026 च्या परीक्षेत श्रीविवेकानंद सेवा संघ संस्थेतर्गत नेरपिंगळाई येथील यशप्रथित श्री विवेकानंद कन्या विद्यालयातील गुणवंत कन्यांनी परीक्षेच्या यज्ञकुंडात परीश्रमाची समिधा अर्पण करीत पुन्हा भरभरुन यशाचे वैभव प्राप्त करून दिलेत. त्यांच्या या दैदीप्यमान यशामागे संस्थेचे ध्येयदर्शी नेतृत्व ' विद्यालयाची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरा ' विद्यार्थ्यांच्या पंखांना यशाचे बळ देण्या करिता अविरत अन् समर्पित परिश्रम करणारे आदरणिय शिक्षकवृंद योगेंद्र तट्टे सर ' पी.बी आडे सर , पंकज कडू सर ' प्रीती सावरकर मॅडम ' यांची प्रेरणादायी मार्गदर्शन तसेच आपल्या लेकरांच्या उज्वल भवितव्यासाठी आयुष्य झिजविणाऱ्या पालकांचा सहभाग होता*.
     *यशाच्या या सुवर्ण अध्यायात कु .समृद्धी सुजित भोपळे हिने 94.60% गुण संपादन करीत नेरपिंगळाई सर्कलमधून प्रथम येवून उल्लेखनीय यशाची नोंद करून विद्यालयाच्या यशमुकुटांत यशाचा तुरा खोवला. कु. संस्कृती अरुण माहोरे हिने 93.80% प्राप्त करीत सर्कलमधून द्वितीय येण्याचा बहुमान प्राप्त केला . कु.वैभवी विलास खुरपडे हिने 92 % गुण प्राप्त केलेत . कु . भक्ति संदिप मेंढे हिने 90.80 % गुण प्राप्त केलेत. कु. सेजल रमेश सुरजुसे हिने  90.20 % गुण प्राप्त केलेत .कु. युगांती फुसे हिने 85.60 % गुण प्राप्त केलेत तर आनंदी मंगेश राऊत हिला 81.60% गुण प्राप्त करीत गुणवत्तेची मोहोर उमटविली*
     *गुणवंत विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशाचा गौरव मुख्याध्यापिका सौ. मंजुषा देशमुख आणि शिक्षकवृंद यांनी त्यांचा घरी जावून पालकांसह गुलाबपुष्प देवून सन्मान केला. तसेच संस्थेचे अध्यक्ष सन्मा डॉ. धनंजय तट्टे सर आणि आदरणिय पदाधिकारी ' तथा पी. आर. देशमुख सर ' कळसकर मॅडम ' मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. लांडे सर , जगदिश देशमुख ' इखे सर यांनी प्रतिभावंत कन्यांचे दैदिप्यमान यशाबद्दल अभिनंदन करून 'ज्ञानतपस्येचा विजयदीप ' अखंडित रहावं , समाजात आदर्श निर्माण करून आपल्या देशाचा गौरव वाढवावा करिता शुभेच्छा दिल्यात*.
     *कॉपीमुक्त , पारदर्शक आणि मुल्यधिष्ठित परीक्षापद्धती मुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचे नवे क्षितीज निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली ' प्रामाणिक परिश्रम हेच यशाचे खरे अधिष्ठान आहे ' या मुल्याने यशस्विनींनी नव्याने अधोरेखित केलेले त्यांच्या यशाची सुवर्णगाथा ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचा चिरंतन दीपस्तंभच ठरेल . त्यांच्या दैदीप्यमान यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुकाचे सत्र सुरु आहे* *उल्लेखनीय बाब म्हणजे अनेक विद्यार्थिनींनी उच्च शिक्षणासाठी आय .आय.टी . सारख्या उच्चस्तरीय स्पर्धात्मिक व ज्ञान प्रधान क्षेत्राकडे वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला असून ग्रामीण मातीतून उगवणाऱ्या प्रतिभावंत कन्या शक्तीचे हे उदाहरण प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. ज्ञानदीपांच्या या अखंड परंपरेला तेज देणाऱ्या या यशस्विनी आकाशाला नक्कीच गवसणी घालू शकतात . त्यांच्या प्रभावी अन् पुढील वाटचालीस शुभेच्छा*
   .