Ticker

6/recent/ticker-posts

बौद्ध धम्मावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा :


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-स्थानिक प्रगती काॅलनी सेंदुरवाफा साकोली येथे रमाई महिला संघ प्रगती काॅलनी सेंदुरवाफा साकोलीच्या वतीने बौद्ध धम्मावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवकीताई बोरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. 
 बौद्ध धम्मावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेत सर्व वयोगटातील एकूण १४ स्त्रियांनी सहभाग घेतला. प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना बौद्ध धम्मावर आधारित प्रश्न प्रा. डॉ. शंकर बागडे यांनी  विचारले. प्रश्नाचे योग्य उत्तर देणाऱ्या स्पर्धकांना गुण देण्यात आले. या प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण ५०  प्रश्न विचारले गेले होते. यापैकी ज्या स्पर्धकांनी अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे दिली. अशा तीन स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात आले. यामध्ये  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नलिनी करमनकर यांना देवकीताई बोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देवकीताई बोरकर यांना डॉ. शंकर बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रणिता सोनटक्के यांना वंदना बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे तीनही विजेत्यांना पारितोषिके डॉ. शंकर बागडे यांच्याकडून देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ. शंकर बागडे यांनी केले तर गुणदानाचे कार्य व आभारप्रदर्शन प्रा. ज्योती रामटेके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाई महिला संघ प्रगती काॅलनी सेंदुरवाफा साकोलीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या