चित्रा न्युज प्रतिनिधी 
उदगीर:- उदगीर तालुक्यातील मौजे.नळगीर शिवारात चिंचेच्या झाडाखाली कांहीजण पैशावर ३ पानी तिर्रट जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोउपनि.
प्रवीण हालसे यांनी याचा माग काढत दि.१२ जुलै ला ५.३० वा.सदर ठिकाणी रेड टाकली असता १)नामदेव
प्रल्हाद पवार(नळगीरतांडा)२)संजय काशीराम राठोड
(धर्मातांडा ता.जळकोट),३)गोतावळे दगडोबा गोविंद (सोनवळा ता.जळकोट),४)रंजीत मरेप्पा मोटेवाड
(जळकोट)५) सुदर्शनदेव मूलशंकर कापसे(नळगीर ता.उदगीर)६)दिपक सुर्यकांत गायकवाड(नळगीर)
७)संतोष माधवराव बीजले(नळगीर ता.उदगीर)
८)गणेश बालाजी पेदावाड रा.नळगीर ता.उदगीर हे ८ जुगारी गणेश पेदावाड याच्या शेतातील चिंचेच्या झाडाखाली स्वत:च्या फायद्यासाठी ३ पानी तिर्रट नावाचा जुगार खेळवित व खेळत असताना पोलिसांना
रोख रक्कम १५,५०० रु.व २०,५०,००० हजाराच्या ४ चाकी २ गाड्या आणि २ लाख ७० हजाराच्या ४ दुचाकी गाड्या असा एकुण २३,३५,५०० रुपयांच्या मुद्देमालांसह मिळून आले असून पोउनि.प्रवीण हालसे यांनी याची फिर्याद दिल्याने वरील आरोपींविरुद्ध गुरनं. २२० / २०२६ कलम.१२ (अ) मुंजुका प्रमाणे पो.स्टे. वाढवणा मध्ये गुन्हा दाखल झाला असून याचा पुढील तपास इकराम उजेडे करत आहेत.
पोउपनी.प्रवीण हालसे यांनी दोन दिवसांमध्ये केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.म्हणुन त्यांनी आपला दबदबा अवैध धंदे करणा-यांमध्ये निर्माण केला असून हालसेंनी अवैध धंदेवाल्यांची दुनिया हालवून टाकली आहे.असे म्हटले जाते.

सदरची कारवाई अमोल तांबे(पोलिस अधिक्षक)
मंगेश चव्हाण(अप्पर पोलिस अधिक्षक)अरविंद रायबोले(उपविभाग पोलिस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी. सुनील गायकवाड,पोउपनी.
प्रवीण हालसे,पो.ह.इकराम उजेडे,सहाय्यक फौजदार शेख,पो.ना.चंचलवाड,पो.काॅ.कांगणे यांनी केली आहे