मतदान पद्धतीने निवड, ग्रामपंचायतकडून अभिनंदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी (श.प्र.) :- लाखनी तालुक्यातील निलागोंदी येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी धनपाल मंगर हटवार यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.नवनिर्वाचित अध्यक्ष धनपाल हटवार यांचे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या गृहखात्याने 19 जुलै 2007 रोजी एमआयएस:1007/ सीआर-238/पीओएल-8 या जी.आर.द्वारे पर्यायी वाद निवारणासाठी हा नवोन्मेषकारी उपक्रम सुरू केला होता. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री दिवंगत माननीय आर. आर. पाटील यांच्या प्रेरणेतून महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती ही संकल्पना अस्तित्वात आली. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेतून या समितीचे पुनर्गठन करण्यात येते.त्यानुसार निलागोंदी येथे 25 ऑगस्ट रोजी तंटामुक्त समिती निवडीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात धनपाल हटवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी सरपंच वर्षा महावीर वंजारी, उपसरपंच महेश का. हटवार, ग्रामपंचायत सदस्य दिनेश नीलकंठ वंजारी, छत्रपती हटवार, ग्रामपंचायत सदस्या प्रयती वरठे, स्मिता बन्सोड, विद्या हटवार, सुषमा शेंडे, रोजगार सहाय्यक खुशाल भुरे, डाटा ऑपरेटर विष्णु वंजारी, ग्रा.पं. कर्मचारी निलेश वंजारी, विनायक शेंडे व ग्रामस्थ उपस्थित होते.उपस्थितांनी नवनियुक्त तंटामुक्त समिती अध्यक्ष धनपाल हटवार यांचे अभिनंदन करून त्यांच्याकडून निष्पक्ष न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.


0 टिप्पण्या