Ticker

6/recent/ticker-posts

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वर्षभरापासून स्ट्रीट लाईट बंद; तक्रारी करूनही अधिकारी झोपेतच?


👉आरमोरीतील ब्रम्हपुरी–नागभीड महामार्ग अंधारात; अपघाताची शक्यता,   

👉 प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभारामुळे मुळे नागरिक संतप्त


चित्रा न्युज प्रतिनिधी 
आरमोरी : ( चक्रधर मेश्राम) आरमोरी शहरातून गजबजलेल्या शहरातून  ब्रम्हपुरी–नागभीड कडे  जाणाऱ्या महामार्गावरील स्ट्रीट लाईट मागील वर्षभरापासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी संपूर्ण मार्ग अंधारात  असताना काही  अनुचित घटना घडू शकतात यात शंका नाही.  याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना  गांभीर्य कधी जाणवणार, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यां प्रज्ञा निमगडे आणी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
स्ट्रीट लाईट सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि  जीवनाशी खेळ सुरू केला आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते .  सदर महामार्ग असून, रात्रीच्या अंधारामुळे वाहनचालक आणि  नेहमीच्या पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे अपघात किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही आता नागरिकांकडून केला जात आहे. या मुख्य रस्त्यावरील 
वर्षभर स्ट्रीट लाईट बंद ठेवून प्रशासन नेमके कोणत्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? असा थेट प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा निमगडे यांनी उपस्थित केला आहे.
महामार्गावरील बंद असलेल्या स्ट्रीट लाईटची तातडीने पाहणी करून दुरुस्ती करावी आणि त्वरित सर्व स्ट्रीट लाईट सुरू करावेत, अशी ठाम मागणी प्रज्ञा निमगडे यांनी संबंधित प्रशासनाकडे केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने आता विलंब न करता प्रत्यक्ष कारवाई करावी, अन्यथा प्रशासनाच्या दुर्लक्षीत कारभाराच्या विरोधात तीव्र भूमिका घेण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या