Ticker

6/recent/ticker-posts

संकल्प कॉन्व्हेंट स्कूल भोयगाव येथे उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा


संस्थेच्या सचिव सौ. वर्षा दरवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण




प्रतिनिधी : राजेश येसेकर

चंद्रपूर :  दि. 15/08/2026, शनिवार रोजी मधुकरराव दर्वेकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित संकल्प कॉन्व्हेंट स्कूल, भोयगाव येथे 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सचिव सौ. वर्षा दरवेकर यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी राष्ट्रगीत गायन करून सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी राष्ट्राला सलामी दिली.

ध्वजारोहणानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य व भाषणे सादर करून स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. विद्यार्थ्यांनी दिलेली भाषणे प्रेरणादायी ठरली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सौ. धांडे  यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.ठावरी यांनी केले.
या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

देशभक्तीच्या भावनेने संपूर्ण शालेय परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन गेला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या