चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-योग भारती बहु.संस्था व ज्येष्ठ नागरिक बचतगट च्या वतीने बचत गट सभेचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी प्रगतीशील शेतकरी,क्रीड़ा प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते तथा कंत्राटदार श्री रुपेश टांगले यांचे सत्कार करण्यात आले.क्रंचमील वेस्टर्न फूड हॉटेल भंडारा येथे आयोजित त्रैमासिक सभा व सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री वामन गोंधुळे तर प्रमुख पाहुणे योग भारती बहु.संस्थेचे अध्यक्ष व प्रमुख योगशिक्षक श्री शाम कुकडे,पतंजली योग समिती मिस्कीन गार्डन चे अध्यक्ष हपभ श्री महादेव बांगडकर ,समाजसेवक श्री शंकर निम्बार्तें,वनपरिक्षेत्राधिकारी श्री योगेश शर्मा (अडयाळ),अतुल वर्मा,आत्माराम बेदरकर,आनंद बाभरे,प्रा.गुरुप्रसाद पाखमोडे,के. झेड.शेंडे,सईद शेख,दिनेश पंचबुधे,अनिल शेंडे,शिवराम बारई, अरुण गावंडे,विनोद सपाटे,विठ्ठल सेलोंकर,पुरुषोत्तम समरीत,पुरुषोत्तम वैद्य,मारोती शेंडे ईतर योगसाधक व बचत गटांचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. मान्यवर पाहुणे हस्ते रुपेश टांगले यांचे पुष्पगुच्छ,शॉल व भेंट वस्तू देवून सत्कार करण्यात आले.सईद शेख यांनी भंडारा जिल्हा पर्यटन पुस्तक त्यांना भेट दिली. कुणबी समाजासाठी नि:स्वार्थ सेवा कार्य करणारे श्री शंकर निंबार्ते यांचे ही या प्रसंगी रुपेश टांगले यांचे तर्फे सानुग्रह राशि देवून सत्कार करण्यात आले. सर्वश्री गोंधुळे ,बाभरे,शेख,वर्मा, शर्मा इत्यादिनी आपल्या मार्गदर्शनात रुपेश टांगले यांच्या कार्याचे गुणगौरव करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम कुकडे यांनी तर आभार प्रदर्शन आत्माराम बेदरकर यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी सर्वानी भोजनाचा आस्वाद घेतला.


0 टिप्पण्या