Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे आयोजन

साकोली:- रवि भोंगाने
 
वनविभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे आयोजन नागपूर येथे करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला वनरक्षक, वनपाल, वनमजूर, वनकर्मचारी आणि अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटना यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. देशाच्या विविध भागात वन कर्मचारी वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धनाचे कर्तव्य बजावीत असतात. कर्तव्य बजावित असतांना कर्मचारी, अधिकारी यांना आपल्या प्राणांची कधीकधी आहुती ( बलिदान ) द्यावे लागते. त्यामुळे विभागासह त्यांच्या कुटुंबावर संकट ओढवत असते. समाजासाठी आपल्या कर्तव्याच्या माध्यमातून देश सेवा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसाठी "राष्ट्रीय वन हुतात्मा दिन " आयोजित करण्यात येतो. आपल्या स्वतःच्या प्राणाचे, आपल्या जीवाची बाजी लावून सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीर हुतात्म्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना मानवंदना व भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात येत असते.
फॉरेस्टर आणि फॉरेस्ट गार्ड असोसिएशन ठाणे संवलग्नित महाराष्ट्र वनसंरक्षक, वनपाल संघटना नागपूर आणि अखिल भारतीय वन अधिकारी महासंघ नवी दिल्ली यांच्यावतीने ११ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे नागपूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे. या हुतात्मा दिनाला राज्यातील सर्व वनरक्षक, वनपाल, वनमजूर, वनकर्मचारी अधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र भदाणे, प्रदेश कार्याध्यक्ष दौलत भोसले, प्रदेश महासचिव समीर जाधव, प्रदेश कोषाध्यक्ष प्रदीप कोडापे, प्रदेश महिला प्रमुख मयुरी कळमकर, प्रदेश मुख्य सल्लागार राजाराम मांजे, मंत्रालय कामकाज प्रमुख अभिजीत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप बाळापुरे, अण्णासाहेब वडजे, देवीदास जाधव, ऋषी मडावी, प्रदेश उप महासचिव संदीपकुमार शेंडे, प्रदेश सचिव संतोष विरादार, गुणवंत दर्वे, लक्ष्मण शेळके, अंबाजी बिराडे, प्रदेश मुख्य प्रवक्ता संजय शेंडे, प्रदेश मुख्य संघटक नितीन खताळ, प्रदेश सहसचिव प्रवीण सगणे, अमोल झीनकरवाड, होमराज भट, विठ्ठलराव आदे, दीपक जमदाले आणि प्रमुख मार्गदर्शक मो  गाजी शेख यांनी केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या