Ticker

6/recent/ticker-posts

कै.मधुकर हालसे यांच्या स्मरणार्थ शाळेस प्रिंटर भेट

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-कै.मधुकर नामदेवराव हालसे यांच्या स्मरणार्थ तसेच स्वातंञ्य दिनानिमित्त्य वाढवणा बु.येथील पो.उपनिरीक्षक प्रवीण हालसे व परिवारातर्फे सावरीतील जि.प.कें.प्रा.शाळेस "प्रिंटर" भेट देण्यात आला.
शिक्षणाचा श्रीगणेशा ज्या शाळेत सुरु झाला,त्या जि.प.कें.प्रा.शाळेचे आपण कांहीतरी देणे लागतो या प्रामाणिक भावनेतून व सामाजिक कर्तव्यातून "प्रिंटर" भेट दिल्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण हालसे म्हणाले.
या प्रसंगी शाळेतर्फे श्री व सौ हालसेंचा सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या